करवाई शून्य: जिल्हा प्रशासनही झाले हतबल सोलापूर: सेतूमधील दलालाने एका युवकास सिनेस्टाईल मारहाण केली, अर्धा डझनहून अधिक उपजिल्हाधिकार्यांनी येऊन सेतूवर धाड टाकली, दोन गुन्हे दाखल होतील असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले तरीही कोणतीच कारवाई झाली नाही़ पुन्हा नेहमीप्रमाणे सेतूमध्ये दलालाचे वर्चस्व सुरू झाल़े त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आह़ेसेतू कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा आहे, अनेकांना तो मारुन पळून जाणारा व्यक्ती कोण हे माहीत असताना अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवून हात झटकले आहेत़ सेतूमध्ये असलेल्या कर्मचारी तसेच तहसीलदार आणि तलाठी यांच्याबद्दल नागरिकांची ओरड आह़े एवढा मोठा प्रकार घडला असतानाही मंगळवारी सेतूमध्ये कोणीही वरिष्ठ अधिकारी फिरकला नाही़ सेतूमध्ये मंगळवारी देखील दाखले घेण्यासाठी भली मोठी रांग होती़ सेतूमधील दलालांना जिल्हा प्रशासनानेच सांभाळले आहे काय? असा सवाल देखील नागरिक करू लागले आहेत़ कोट़़़ सेतू कार्यालयात मोठय़ा प्रमाणावर दलालांचा सुळसुळाट आह़े गर्दी असतानाही कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही़ महिलांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था केली पाहिज़े किशोर झेंडेकर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया
सेतूवर पुन्हा दलालांचे वर्चस्व
कारवाई शून्य: जिल्हा प्रशासनही झाले हतबल
By admin | Updated: July 1, 2014 22:08 IST2014-07-01T22:08:55+5:302014-07-01T22:08:55+5:30
कारवाई शून्य: जिल्हा प्रशासनही झाले हतबल
