नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर कल आणि स्थानिक बाजारांत दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीत घेतलेला आखडता हात यामुळे सोन्या-चांदीच्या भावात गुरुवारी घसरण झाली. सोने १४0 रुपयांनी घसरून २७,२00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदी ३00 रुपयांनी घसरून ३८,४00 रुपये प्रति किलो झाली.
जागतिक बाजारात सोने तीन आठवड्यांच्या नीचांकावर गेले आहे. सिंगापुरात सोन्याचा भाव 0.१ टक्क्यांनी घसरून १,१८३.६६ डॉलर प्रति औंस झाला. चांदीचा भाव 0.२ टक्क्यांनी घसरून १६.४९ डॉलर प्रति औंस झाला. याचा परिणाम भारतातील व्यवसायावर झाला. दागिने निर्मात्यांकडून असलेली मागणी कमी झाली. तयार चांदीचा भघव ३00 रुपयांनी घसरून ३८,४00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ५१५ रुपयांनी घसरून ३७,९३0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ५५ हजार आणि विक्रीसाठी ५६ हजार प्रति शेकडा असा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १४0 रुपयांनी घसरून अनुक्रमे२७,२00 रुपये आणि २७,0५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. गेल्या दोन दिवसांत सोन्याचा भाव ११५ रुपयांनी वाढला होता. आठ ग्रॅमच्या सोन्याच्या गिन्नीचा भघव मात्र २३,७00 रुपये असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला.
दोन दिवसांच्या तेजीनंतर सोन्या-चांदीचा भाव खाली
जागतिक बाजारातील कमजोर कल आणि स्थानिक बाजारांत दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीत घेतलेला आखडता हात यामुळे सोन्या-चांदीच्या भावात गुरुवारी घसरण झाली.
By admin | Updated: June 4, 2015 23:17 IST2015-06-04T23:17:11+5:302015-06-04T23:17:11+5:30
जागतिक बाजारातील कमजोर कल आणि स्थानिक बाजारांत दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीत घेतलेला आखडता हात यामुळे सोन्या-चांदीच्या भावात गुरुवारी घसरण झाली.
