Lokmat Money > बिझनेस न्यूज > २०३० नंतर भारत तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता

२०३० नंतर भारत तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता

सेंटर फॉर इकॉनॉमिक्स बिझनेस अँड रिसर्च (सीईबीआर) या ब्रिटिश थिंक टँकने सोनेरी भारताची प्रतिमा सादर केली आहे.

By admin | Updated: December 28, 2015 00:39 IST2015-12-28T00:39:51+5:302015-12-28T00:39:51+5:30

सेंटर फॉर इकॉनॉमिक्स बिझनेस अँड रिसर्च (सीईबीआर) या ब्रिटिश थिंक टँकने सोनेरी भारताची प्रतिमा सादर केली आहे.

After 2030, India was the third largest super power | २०३० नंतर भारत तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता

२०३० नंतर भारत तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता

लंडन : सेंटर फॉर इकॉनॉमिक्स बिझनेस अँड रिसर्च (सीईबीआर) या ब्रिटिश थिंक टँकने सोनेरी भारताची प्रतिमा सादर केली आहे. या संस्थेच्या अभ्यासानुसार २०३० नंतर भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊ शकेल.
या संस्थेच्या अंदाजानुसार २०५० पर्यंत भारत त्यावेळी क्रमांक एकवर असलेल्या चीनला मागे टाकून अव्वल क्रमांक पटकावेल. २०३० पर्यंत होणाऱ्या भारताच्या प्रगतीने विकसित देशांच्या ग्रुप जी-८ मधून फ्रान्स किंवा इटली बाहेर पडतील किंवा या गटात भारताचा समावेश करण्यासाठी सदस्य संख्या वाढवावी लागेल.
वेगाने पुढे जाणाऱ्या चिनी ड्रॅगनबाबतही या अहवालात जबरदस्त आकलन करण्यात आले आहे. या अहवालाचे निष्कर्ष खरे होतील, असे गृहीत धरल्यास २०२९ पर्यंत चीन अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनेल. त्यावेळी अमेरिका दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल; पण त्यावेळच्या तिन्ही देशांच्या जीडीपीचे करण्यात आलेले विश्लेषण पाहता तुलनात्मकदृष्ट्या भारत मागे
दिसतो.
सी.ई.बी.आर.च्या अंदाजानुसार २०३० मध्ये भारताचा जीडीपी अंदाजे १०,१३३ अब्ज डॉलर राहील. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या अमेरिकेचा जीडीपी अंदाजे ३२,९९६ अब्ज डॉलर होईल. चीनचा जीडीपी मात्र ३४,३३८ अब्ज डॉलर होण्याचा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे. भारताच्या प्रगतीचा वेग पाहता २०१९ मध्ये हा देश राष्ट्रकुल संघटनेत सर्वात मोठी आर्थिक महासत्ता होऊ शकेल. याचा अर्थ भारत ब्रिटनच्या पुढे निघून जाईल.
आगामी १५ वर्षांत पाश्चिमात्य जगतात ब्रिटनची आर्थिक प्रगती सर्वात चांगली असेल. विशेषत: सॉफ्टवेअर आणि आयटी सेक्टरमुळे ब्रिटनची वेगाने प्रगती होईल. सध्या फ्रान्स पाचव्या क्रमांकावर आहे. ‘गंभीर’ आर्थिक परिस्थितीमुळे २०३० पर्यंत फ्रान्सची घसरगुंडी होऊन तो देश पाचव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर पोहोचेल, सध्या ८ व्या क्रमांकावर असलेल्याइटलीची परिस्थितीही गंभीर आहे. २००० मध्ये युरोत सामील झाल्यापासून इटलीची आर्थिक प्रगती खूपच मंदावली आहे.
सध्या युरोपात जर्मनी क्रमांक एकवर आहे. हा देश मात्र आपले स्थान कायम ठेवण्यात यशस्वी होईल, असे हा अहवाल म्हणतो.
एकविसाव्या शतकात जागतिक अर्थव्यवस्थेत अमूलाग्र बदल झाले आहेत. लोकसंख्या बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.

Web Title: After 2030, India was the third largest super power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.