Lokmat Money > बिझनेस न्यूज > जाहिरात बातमी आवश्यक

जाहिरात बातमी आवश्यक

अकोला - अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार उषा विरक यांच्या प्रचार अभियानात रंग चढला असून, महिला व युवकांच्या पहिल्या पसंतीला उषा विरक पूर्णपणे उतरत आहेत. त्यांच्या जनसंपर्क प्रचार अभियानास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

By admin | Updated: October 4, 2014 23:41 IST2014-10-04T23:41:58+5:302014-10-04T23:41:58+5:30

अकोला - अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार उषा विरक यांच्या प्रचार अभियानात रंग चढला असून, महिला व युवकांच्या पहिल्या पसंतीला उषा विरक पूर्णपणे उतरत आहेत. त्यांच्या जनसंपर्क प्रचार अभियानास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Advertising News Required | जाहिरात बातमी आवश्यक

जाहिरात बातमी आवश्यक

ोला - अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार उषा विरक यांच्या प्रचार अभियानात रंग चढला असून, महिला व युवकांच्या पहिल्या पसंतीला उषा विरक पूर्णपणे उतरत आहेत. त्यांच्या जनसंपर्क प्रचार अभियानास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आपल्या प्रचार अभियानाचा श्रीगणेशा त्यांनी स्थानिक राधाकिसन प्लॉट परिसरातून केला असून, या परिसरात त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असून विकासासाठी आता केवळ उषा विरक यांचेच नाव मतदारसंघात जो तो घेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान मोहता मिल, मुजफ्फरनगर, खोलेश्वर, रजपूतपुरा, देवरावबाबा चाळ, राधेनगर आदी परिसरात उषा विरक यांनी झंझावाती प्रचार अभियान राबवून वातावरण संपूर्ण काँग्रेसमय केले. या प्रचार अभियानात मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांनी विजयाचा कौल संपादन केला. घरोघरी यावेळी उषा विरक यांना महिलांनी ओवाळून शुभाशीर्वाद दिले. तसेच विकासासाठी केवळ आपणच लायक असून, आपणास निवडून देण्याचे आश्वासन यावेळी शेकडो मतदारांनी केले.
मुजफ्फर परिसरात उषा विरक यांचे आपल्या प्रचार ताफ्यासह आगमन होताच बँडबाजा व ढोलताशांनी त्यांचे जंगी स्वागत मुस्लीम महिला मतदारांनी केले. नरेंद्र मोदी यांचे मुस्लीमविरोधी धोरण हे मुस्लीम महिला व युवकांना परवडणारे नसून, राज्याच्या खुशहाली व सामाजिक समरसतेसाठी जाती-पातीचे राजकारण न करता सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याची ताकद असण्याची किमया केवळ काँग्रेसपाशीच आहे. अकोला पश्चिममधून एका सर्वसाधारण नगरसेविकेला विधिमंडळाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून काँग्रेसने सामाजिक समरसतेचा परिचय दिला असल्याची चर्चा मतदारात व्यक्त करण्यात येत होती. यावेळी महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मदन भरगड, रमाकांत खेतान, दिलीपसिंग गोसल, शे. अय्युब पहेलवान, डॉ. चंद्रकांत पनपालिया, अनुप खरारे, नसरुद्दीन सोफी, चंद्रकांत सावजी, डॉ. स्वाती देशमुख, हाजी अनीक, राजेश राऊत, महादेवराव हुरपडे, हाजी हनिफ, रमेश मोहोकार, उमाकांत कवडे, विलास गोतमारे, राजेश राऊत, प्रभजितसिंह बछेर, शेख हारून, कादर शाह, मोईन शाह, शब्बीर भाई, मोहसीन खान, रशीद खान, सैयद महेबूब, सैयद वाजीब, शेख रहेमान, इमरान शाहा, समीर अहेमद, शेख सलमान,
(उर्वरित बातमी पुढील फाईलमध्ये)
-----------------

Web Title: Advertising News Required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.