Lokmat Money > बिझनेस न्यूज > जाहिरात विभाग : प्रॉपर्टी खरेदीतील काही बारकावे जोड- १

जाहिरात विभाग : प्रॉपर्टी खरेदीतील काही बारकावे जोड- १

एन.ए. नियम

By admin | Updated: September 2, 2014 00:34 IST2014-09-02T00:34:01+5:302014-09-02T00:34:01+5:30

एन.ए. नियम

Advertising Department: Add Some Reports to Property Buying - 1 | जाहिरात विभाग : प्रॉपर्टी खरेदीतील काही बारकावे जोड- १

जाहिरात विभाग : प्रॉपर्टी खरेदीतील काही बारकावे जोड- १

.ए. नियम
निश्चित केलेल्या गावठाणांव्यतिरिक्तच्या जागेवर निवासी अथवा औद्योगिक विकासासाठी प्रस्ताव देताना हा भाग अकृषक करून घ्यावा लागतो. मुळात शेतीखाली असलेल्या जमिनीचा वापर शेतीशिवाय इतर कारणांसाठी करावयाचा असल्यास त्याचे अकृषक जमिनीत रूपांतर करावे लागते. याचा अर्थ यामुळे कृषी लागवडीखालील क्षेत्र कमी करीत होत असते. याचा अर्थ यामुळे शेतसार्‍याच्या रूपाने सरकारी तिजोरीत जमा होणारा महसूल कमी होणार असतो. त्याची भरपाई म्हणून तत्कालीन ब्रिटिश काळात एनएची सुरुवात झाली. यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे एकदा जमीन अकृषक करून घेतली की, जबाबदारी संपत नाही, तर हा अकृषक कर दरवर्षी भरणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक ठरते. शेतसार्‍याप्रमाणेच हे वर्ष १ ऑगस्ट ते ३१ जुलै असे असते. अकृषक करून घेतलेल्या जमिनीवरील घरे, बंगले, फ्लॅट या सर्वांनी हा कर भरणे आवश्यक आहे. हा कर नाममात्र असतो. उदाहरण द्यायचे तर औरंगाबादलगत सातारा परिसरात हा कर २.५० ते २.७५ रु. प्रती चौरस मीटर आहे. अर्थात बंगल्यांना सरासरी वार्षिक ३०० रुपये, तर फ्लॅटस्ना सरासरी ७० रुपये भरावे लागू शकतात. या रकमेतून ग्रामपंचायतीला विकासासाठी अनुदान दिले जाते. ग्रामीण भागात तलाठी, तर शहरी भागात तहसील कार्यालयात ही रक्कम भरता येते. आपल्या अधिकारांसाठी सजग राहत असताना अशा प्रकारच्या कर्तव्यासाठीही उत्स्फूर्तपणे पुढे येणे आदर्श नागरिकांचे कर्तव्यच ठरते.

Web Title: Advertising Department: Add Some Reports to Property Buying - 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.