द्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊसकोल्हापूर : कोल्हापूर शहरासह सांगली-मिरज व सातारा जिल्ह्यांत शुक्रवारी दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. गेले दोन-तीन दिवस या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. इचलकरंजी शहर व परिसराला तर मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. सांगली, मिरजेत सलग पाचव्या दिवशी पावसाची संततधार सुरूच राहिली. शहर परिसरातील सखल भागात पाणी साचून राहिले आहे. तर, सातारा, फलटणसह अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. इचलकरंजीत गणेशाचे आगमन होत असतानाच दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या धुवाधार पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. अर्धा तास अक्षरश: पावसाने झोडपून काढले.जत, आटपाडी, खानापूरमध्ये उघडीपसलग चार दिवस कोसळणार्या पावसाने जत, आटपाडी व खानापूर तालुक्यांत मात्र शुक्रवार सकाळपासून उघडीप दिली. मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यांत आजही पावसाची रिपरिप होती. कडेगाव, पलूस, तासगाव व शिराळा तालुक्यांत रात्रभर संततधार होती. नागरिकांना गणरायाचे स्वागत भर पावसातच करावे लागले. ----फोटो: 29 कोल्हापूर 01 इचलकरंजीत शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे आठवडी बाजारात पाणी साचले होते. (छाया-उत्तम पाटील)
पाऊस जोड
दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस
By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:22+5:302014-08-29T23:33:22+5:30
दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस
