Lokmat Money > बिझनेस न्यूज > मेंदू तल्लख राहण्यासाठी जोड

मेंदू तल्लख राहण्यासाठी जोड

चॉकलेटस् खा

By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:06+5:302014-08-29T23:33:06+5:30

चॉकलेटस् खा

Add to the brain the brilliance | मेंदू तल्लख राहण्यासाठी जोड

मेंदू तल्लख राहण्यासाठी जोड

कलेटस् खा
चॉकलेटस्मधील कोकोमुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. कोकोमध्ये स्मरणशक्ती वाढवणारे फ्लॅवेनॉल्स असतात. यामुळे मेंदूच्या विशिष्ट भागातील रक्ताभिसरणाची क्रिया अधिक कार्यक्षमतेने होते. त्यामुळे रोज किमान एक चॉकलेट खाणे फायद्याचे ठरते.

माइंड गेम
एका ट्रेमध्ये सात-आठ वस्तू ठेवून त्यावरून केवळ एका मिनिटामध्ये नजर फिरवा. नंतर ट्रे बाजूला करून पाहिलेल्या वस्तू पटापट कागदावर उतरवा. काही प्रयोगांनंतर वेळ कमी करीत जा. या गेमचाही खूप उपयोग होतो.


व्हिज्युअलायजेशन
वाचन केल्यानंतर ते लक्षात राहण्यासाठी व्हिज्युअलाईज करा. म्हणजे एखादा प्रसंग वाचल्यानंतर तो डोळ्यासमोर आणा. त्यामुळे तो कायमचा लक्षात राहतो. याचप्रमाणे आपल्याला दिवसभरात एखादे काम करायचे आहे, ते तुम्ही करीत आहात, असे चित्र डोळ्यासमोर आणा. ते काम नक्कीच तुमच्या लक्षात राहील.

आहार
या ट्रिक्सबरोबर डाएटवरही लक्ष दणे गरजेचे आहे. रोज रात्री पाण्यात बदाम भिजत घालून दुसर्‍या दिवशी खावेत. त्याचबरोबर पालेभाज्यांचाही रोजच्या आहारात समावेश करा. मोड आलेली कडधान्ये, सर्वच प्रकारची फळे आहारात असू द्यावीत. शरीर तंदुरुस्त असेल तर मनही आनंदी असते, हे लक्षात ठेवा.

Web Title: Add to the brain the brilliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.