Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुरुंगाचे नियम न पाळणार्‍या आमदारावर कारवाई

तुरुंगाचे नियम न पाळणार्‍या आमदारावर कारवाई

लोकांना भेटण्यास मनाई : तुरुंगाधिकार्‍यांवरही कारवाई

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:14+5:302015-06-25T23:51:14+5:30

लोकांना भेटण्यास मनाई : तुरुंगाधिकार्‍यांवरही कारवाई

Action on unbeaten MLAs | तुरुंगाचे नियम न पाळणार्‍या आमदारावर कारवाई

तुरुंगाचे नियम न पाळणार्‍या आमदारावर कारवाई

कांना भेटण्यास मनाई : तुरुंगाधिकार्‍यांवरही कारवाई
मडगाव : कैद्याचा गणवेश घालण्यास नकार दिल्याने नुवेचे आमदार मिकी पाशेको यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तुरुंगाचे नियम न पाळून बेशिस्त वागल्यामुळे पाशेकोंना आता लोकांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पाशेकोंना अशी सवलत देणारे तुरुंग अधिकारी आदिनाथ भजे यांचीही बदली सड्यावरून कोलवाळला करण्यात आली आहे.
वास्कोचे तुरुंग निरीक्षक गौरीश शंखवाळकर यांनी दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांना पाठविलेल्या अहवालात या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पाशेको आता कैद्याचा गणवेश वापरू लागले आहेत, हेही त्यांनी नमूद केले आहे. पाशेको कैद्याचा गणवेश वापरत नाहीत, अशा आशयाची तक्रार ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांनी न्या. सरदेसाई यांच्याकडे केल्यावर त्यांनी तुरुंगाधिकार्‍यांकडून यासंबंधीचा अहवाल मागितला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Action on unbeaten MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.