Lokmat Money > बिझनेस न्यूज > मनपा काढणार अतिक्रमण ३० नोव्हेंबरपर्यंत कारवाई

मनपा काढणार अतिक्रमण ३० नोव्हेंबरपर्यंत कारवाई

अकोला: उत्तर झोन अंतर्गत येणार्‍या वर्दळीच्या व गजबजलेल्या मुख्य मार्गावरील अतिक्रमकांना हुसकावण्यासाठी अतिक्रमण विभागाने बा‘ा वर खोचल्या आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांनी घेतला आहे.

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST2014-11-22T23:30:29+5:302014-11-22T23:30:29+5:30

अकोला: उत्तर झोन अंतर्गत येणार्‍या वर्दळीच्या व गजबजलेल्या मुख्य मार्गावरील अतिक्रमकांना हुसकावण्यासाठी अतिक्रमण विभागाने बा‘ा वर खोचल्या आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांनी घेतला आहे.

Action to be taken to encroachment till November 30 | मनपा काढणार अतिक्रमण ३० नोव्हेंबरपर्यंत कारवाई

मनपा काढणार अतिक्रमण ३० नोव्हेंबरपर्यंत कारवाई

ोला: उत्तर झोन अंतर्गत येणार्‍या वर्दळीच्या व गजबजलेल्या मुख्य मार्गावरील अतिक्रमकांना हुसकावण्यासाठी अतिक्रमण विभागाने बा‘ा वर खोचल्या आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांनी घेतला आहे.
मनपाच्या उपायुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर दयानंद चिंचोलीकर यांनी जुलै महिन्यात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे त्यावेळी प्रशासनाने स्पष्ट केले होते. अतिक्रमण हटविताना शहरातील गांधी रोड, मोहम्मद अली रोड, डाबकी रोड परिसर, सिंधी कॅम्प परिसरात भेदभाव झाल्याचा आरोप अकोलेकरांनी केल्याने अवघ्या महिनाभरात ही मोहीम गुंडाळण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीची सबब पुढे करीत पोलिस प्रशासनानेदेखील सुरक्षा पुरविण्यास नकार दिला. यामुळे मनपाने ज्या-ज्या भागातील अतिक्रमकांना हुसकावून लावले, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण थाटण्यात आले. अकोलेकरांना सर्वाधिक त्रास शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये होतो. यावर उपाय म्हणून उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे यांनी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत उत्तर झोन अंतर्गत येणार्‍या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉक्स...
या मार्गावर होणार कारवाई
अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन चौक, मदनलाल धिंग्रा चौक ते सिटी कोतवाली चौक, टिळक रोड ते शिवाजी पार्क, टॉवर रोड ते शिवाजी पार्क, मुख्य पोस्ट ऑफीस ते सिव्हिल लाईन चौक ते थेट जवाहरनगर चौक तसेच दक्षिण झोनअंतर्गत येणार्‍या अशोक वाटिका चौक ते कौलखेड चौक, अशोक वाटिका ते तुकाराम चौक तसेच सिव्हिल लाईन चौक ते बिर्ला गेटपर्यंतच्या मुख्य मार्गाचा समावेश आहे.

बॉक्स...
नागरिकांच्या तक्रारीची दखल नाही
शहरातील गल्ली बोळात अतिक्रमकांनी दुकाने, घरे उभारली आहेत. उच्चभ्रू वस्तीमध्ये चक्क रहिवासी इमारतीत जाणार्‍या मार्गावर टिनाची घरे बांधण्यात आली असून, याविषयी उपायुक्त चिंचोलीकरांकडे तक्रारी करून नागरिक अक्षरश: बेदम झाले आहेत. अशा तक्रारी उपायुक्तांनी धुडकावल्याने प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Web Title: Action to be taken to encroachment till November 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.