Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेल, आॅफर्सच्या माध्यमातून बाजारात चैतन्याची गुढी

सेल, आॅफर्सच्या माध्यमातून बाजारात चैतन्याची गुढी

लोकांपासून ते सोनेखरेदी आणि इलेक्ट्रॉनिक्सचे वस्तू मार्केट ते वाहन विक्रेते अशा सर्वच ठिकाणी विविध आॅफर्सची धूम अनुभवायला मिळत आहे.

By admin | Updated: March 19, 2015 23:19 IST2015-03-19T23:19:55+5:302015-03-19T23:19:55+5:30

लोकांपासून ते सोनेखरेदी आणि इलेक्ट्रॉनिक्सचे वस्तू मार्केट ते वाहन विक्रेते अशा सर्वच ठिकाणी विविध आॅफर्सची धूम अनुभवायला मिळत आहे.

Achievements in the market through cell, offices | सेल, आॅफर्सच्या माध्यमातून बाजारात चैतन्याची गुढी

सेल, आॅफर्सच्या माध्यमातून बाजारात चैतन्याची गुढी

मनोज गडनीस - मुंबई
गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून नव्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांपासून ते सोनेखरेदी आणि इलेक्ट्रॉनिक्सचे वस्तू मार्केट ते वाहन विक्रेते अशा सर्वच ठिकाणी विविध आॅफर्सची धूम अनुभवायला मिळत आहे.
प्रसिद्धीच्या सर्वच माध्यमातून या व्यावसायिकांनी विविध प्रकारच्या आॅफर्सची घोषणी केली असून, सर्वात मोठा भर हा गृह व्यावसायिकांतर्फे देण्यात आला आहे. बिल्डरांच्या अनेक लहान-मोठ्या संघटनांनी शहरनिहाय प्रदर्शने भरविण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येते. बांधकाम क्षेत्राचे अभ्यासक अमित कुलकर्णी यांनी या ट्रेंड संदर्भात माहिती देताना सांगितले की, जागतिक मंदी आणि चलनवाढीचा अत्यंत विपरित परिणाम बांधकाम उद्योगावर झाला. परंतु, आता अर्थव्यवस्थेत सुधार दिसून येत असल्याने पुन्हा बांधकाम क्षेत्राच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुंबई आणि राज्यातील प्रमुख शहरांबद्दल बोलायचे, तर एकट्या मुंबईत सुमारे एक कोटी फ्लॅटस् हे बांधून तयार आहेत. मात्र, त्याची विक्री होऊ शकलेली नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांचा पैसा अडकला आहे. किमतीबाबत बोलायचे तर गेल्या सव्वा वर्षांपासून किमतीमध्ये स्थैर्य दिसत आहे. त्यामुळे हा ‘हाऊसिंग स्टॉक’विक्रीसाठी उपलब्ध असल्याने अनेक बिल्डरांनी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये किमान एक लाख रुपये भरून घराची नोंदणी करणे, घर नोंदणी शुल्क आणि स्टॅम्प ड्युटी बिल्डरतर्फे भरण्याची योजना, बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना १० ग्रॅम ते १०० ग्र्रॅमपर्यंत सोन्याची नाणी, दुचाकी वाहन अशा विविध घोषणा केल्या आहेत.
गृहखरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून अनेक बिल्डरांनी बँकांशी करार करत बँकांच्या प्रतिनिधींना त्यांच्या कार्यालयातच स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकाची कागदपत्रे व्यवस्थित असतील तर तत्काळ अंतरित कर्ज मंजुरीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

पुन्हा वन बीच केचा ट्रेंड
गेली पाच वर्ष केवळ टू बीच के, थ्री बीच के आणि त्यापुढील घरांची निर्मिती करणाऱ्या मुंबईतली बिल्डरांना या निर्णयाचा मोठा फटका बसला. रिकाम्या असलेल्य एक कोटी घरांपैकी बहुतांश घरे ही याच श्रेणीतील आहेत. हा धडा घेत बिल्डर मंडळींनी पुन्हा वन बीच के, वन अँड हाफ बीच के, आणि टू बीच के या पारंपरिक तंत्राने नवी बांधणी करण्यास भर दिला आहे आणि याचीच जाहीरातबाजी करण्याकडे भर दिला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सुलभ हप्त्यांत
दोन हजार रुपयांपासून अगदी पाच लाखांच्या हायटेक टीव्ही अशा सर्वच उत्पादनांच्या विक्रीचा वेग वाढावा म्हणून क्रेडिट कार्डांसोबतच खाजगी वित्तीय संस्थांशी इलेक्ट्रॉनिक उत्पादकांनी करार केला आहे. त्यामुळे केवळ काही किमान कागदपत्रे आणि पाचशे रुपयांचे प्रोसेसिंग शुल्क एवढ्यावर तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करता येईल. विशेष म्हणजे, हे वित्तसहाय्य आॅनलाईन मंजूर होणार असल्यामुळे वस्तू निवडल्यानंतर एका तासाच्या आत तुम्हाला ती घरी नेता येईल.

पेट्रोल-सीएनजी गाड्यांना सर्वाधिक मागणी
इंधनाच्या किमती कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारातली उत्साह असून ग्राहकांचा कल हा पेट्रोल व सीएनजी इंधनावर आधारित गाड्यांकडे असल्याचे दिसून आले. डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी रॉनी चढ्ढा यांच्या मते, जुन्या गाड्यांवरील लॉयल्टी बोनससह पाडव्याकरिता किमान १२ ते १५ टक्के कमी किमती, किंवा लक्झरी अ‍ॅक्सेसरिज मोफत देणे अशा योजना विक्रेत्यांनी दिल्या असून यामुळे पाडव्याला मोठ्या प्रमाणावर बुकिंग अपेक्षित आहे.

ई-कॉमर्स फ्लॅश सेल
सणासुदीच्या निमित्ताने ई-कॉमर्स कंपन्यांनीही जोरदार तयारी केली असून अनेक अग्रगण्य कंपन्यांनी विशेष फ्लॅश सेलची घोषणा केली आहे. यात दिवसातील एखाद्या विशिष्ट वेळी पाच ते आठ मिनिटे वेळात एखाद्या विशिष्ट इलेक्ट्रॉनिक्स अथवा अन्य उत्पादनाची किंमत तब्बल ७० टक्क्यांपर्यंत कमी केली जाईल आणि त्याचवेळात विकली जाईल. तसेच दिवसभर विविध उत्पादनांवर वेगवेगळ््या वेळात सूटही मिळेल.

सोन्याचे आकर्षण कायम
सोन्याच्या किमती कितीही वाढत असल्या तरी मुहुर्तावर सोने खरेदी हमखास होते. गेल्या पाच वर्षांप्रमाणे यावर्षी देखील राज्यात एकत्रित अशी सुमारे एक टन
सोने खरेदी होईल असे मानले जात आहे.

Web Title: Achievements in the market through cell, offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.