मुंबई : जनधन योजनेअंतर्गत विविध बँकांतून देशात आतापर्यंत चार कोटी खाती सुरू झाली असली तरी या खात्यासोबत देण्यात येणा-या एटीएम कार्डाच्या सुविधेपासून ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लोक वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे.
शून्याधारित बँक खाती सुरू करून समाजातील मोठ्या वर्गाला वित्तीय वर्तुळात आणून वित्त साखळी मजबूत करण्यासाठी वित्तीय समायोजनाचे धोरण केंद्र सरकारने वाजत गाजत सुरू केले. याकरिता लोकांना खाते उघडतानाच एटीएम कार्ड, एक लाखापर्यंत विमा कवच देण्याची घोषणाही मोदी सरकारने केली. तसेच, २६ जानेवारी २०१५ पर्यंत साडे सात कोटी खाते सुरू करण्याचे लक्ष्य निर्धारित करून दिले आहे. मात्र, घोषणांच्या उपलब्धीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा फारसा विचार न झाल्याने आतापर्यंत सुरू झालेल्या चार कोटी बँक खात्यांपैकी अवघ्या २० लाख लोकांनाच ह्यरुपेह्ण या भारतीय बनावटीच्या तंत्रावर आधारिता एटीएम कार्ड देणे शक्य झाले आहे.
एटीएम कार्डांचे उत्पादन करणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे (एनपीसीआय) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याची कबुली देताना सांगितले की, अवघ्या २० लाख लोकांनाच कार्ड देणे शक्य झाले असून मोठ्या प्रमाणावर कार्डांची निर्मिती बाकी आहे. जनधन योजनेअंतर्गत सुरू होणाऱ्या खात्याच्या एटीएम कार्डाची जवाबदारी ही एनपीसीआयकडे सोपविण्यात आली आहे. परंतु, दोन महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाती सुरू झाल्याने मागणी व पुरवठ्याच्या गणितावर याचा परिणाम झाला आहे.
या कार्डावर संबंधित खातेदाराचे नाव असल्यामुळे कार्ड छपाईस विलंब होत असल्याचे कारण त्यांनी दिले आहे. दरम्यान, ज्यांची खाती सुरू झालेली आहेत, त्यांना ही कार्ड देण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कालावधी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
जनधन खाते सुरू; प्रतीक्षा एटीएम कार्डाची
जनधन योजनेअंतर्गत विविध बँकांतून देशात आतापर्यंत चार कोटी खाती सुरू झाली असली तरी या खात्यासोबत देण्यात येणा-या एटीएम कार्डाच्या सुविधेपासून ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लोक वंचित
By admin | Updated: September 22, 2014 03:39 IST2014-09-22T03:39:26+5:302014-09-22T03:39:26+5:30
जनधन योजनेअंतर्गत विविध बँकांतून देशात आतापर्यंत चार कोटी खाती सुरू झाली असली तरी या खात्यासोबत देण्यात येणा-या एटीएम कार्डाच्या सुविधेपासून ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लोक वंचित
