Lokmat Money > बिझनेस न्यूज > कणेरी परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे अपघात ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

कणेरी परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे अपघात ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

कणेरी : कणेरी (ता. करवीर) आणि उपनगरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांतून होत आहे.

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:19+5:302014-12-12T23:49:19+5:30

कणेरी : कणेरी (ता. करवीर) आणि उपनगरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांतून होत आहे.

Accident due to rowdy dogs in Kaneri area; Ignorance of Gram Panchayat | कणेरी परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे अपघात ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

कणेरी परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे अपघात ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

ेरी : कणेरी (ता. करवीर) आणि उपनगरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांतून होत आहे.
कणेरीजवळ गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत असल्यामुळे कणेरीतून जाणार्‍या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कामगार वर्दळ असते. रस्त्यावर या मोकाट कुत्र्यांमुळे एमआयडीसीतून रात्रपाळीवरून येणार्‍या सायकल, मोटरसायकलस्वारांना तसेच पहाटे फिरायला जाणार्‍या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावर मोकाट कुत्री सायकलस्वार व मोटारसायकलस्वारांचा पाठलाग करतात. त्यामुळे अनेकजण गाडीवरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत; पण याकडे ग्रामपंचायत प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Accident due to rowdy dogs in Kaneri area; Ignorance of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.