लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टाटा उद्योग समूहाचे पदच्युत प्रमुख सायरस मिस्त्री तसेच शापूर मिस्त्री आणि इतरांवर दाखल करण्यात आलेल्या ५00 कोटींच्या अब्रूनुकसानीच्या खटल्याची प्रक्रिया येथील एका स्थानिक न्यायालयाने सुरू केली आहे. टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक आर. वेंकटरमन यांनी यासंबंधीची याचिका गेल्या महिन्यात दाखल केली होती.
महानगर दंडाधिकारी के. जी. पाळदेवार यांनी या खटल्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सायरस इन्व्हेस्टमेंट्स आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट्सचे अन्य संचालकांनाही या खटल्यात प्रतिवादी करण्यात आले आहे. या सर्वांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा मानहानीचा खटला चालेल. सर्व प्रतिवादींना न्यायालयात हजर राहून जामिनासाठी बाँड भरावा लागेल. सूत्रांनी सांगितले की, प्रतिवादींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या फौजदारी मानहानी आणि फौजदारी कट रचणे या आरोपांशी संबंधित कलमाखाली आरोप निश्चित केले जातील. पुढील सुनावणी २४ आॅगस्ट रोजी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. जामिनासाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही प्रतिवादींना देण्यात आले आहेत.
तेव्हा गप्प का होते?
मेमन यांनी म्हटले की, मिस्त्री हे प्रभावशाली, श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्ती आहेत. तथापि, त्यापेक्षाही वेंकटरम यांची प्रतिष्ठा कितीतरी मोठी आहे. वेंकटरमन यांच्यावर बेछूट, बेलगाम, खोटे आणि निराधार आरोप करण्याची परवानगी आरोपींना दिली जाऊ शकत नाही.
टाटा सन्सवरून मिस्त्री यांची हकालपट्टी केल्यानंतरच त्यांनी वेंकटरमन, रतन टाटा, टाटा सन्स आणि इतरांवर मानहानिकारक आणि बेजबाबदार आरोप केले होते. टाटा सन्सवर चेरमन म्हणून कार्यरत असताना मिस्त्री गप्प का होते, असा सवाल मेमन यांनी केला.
सायरस मिस्त्रींविरुद्ध अब्रूनुकसानीचा खटला
टाटा उद्योग समूहाचे पदच्युत प्रमुख सायरस मिस्त्री तसेच शापूर मिस्त्री आणि इतरांवर दाखल करण्यात आलेल्या ५00 कोटींच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 01:23 IST2017-07-06T01:23:42+5:302017-07-06T01:23:42+5:30
टाटा उद्योग समूहाचे पदच्युत प्रमुख सायरस मिस्त्री तसेच शापूर मिस्त्री आणि इतरांवर दाखल करण्यात आलेल्या ५00 कोटींच्या
