Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जळगावात सुमारे तीन हजार टन परप्रांतीय गव्हाची आवक

जळगावात सुमारे तीन हजार टन परप्रांतीय गव्हाची आवक

राजस्थान, गुजरात व मध्यप्रदेशातून आलेला गहू ग्राहकांना भुरळ घालत आहे़ त्यामुळे बाजारातून मोठ्या प्रमाणावर गव्हाची विक्री होत आहे़

By admin | Updated: May 28, 2015 23:43 IST2015-05-28T23:43:00+5:302015-05-28T23:43:00+5:30

राजस्थान, गुजरात व मध्यप्रदेशातून आलेला गहू ग्राहकांना भुरळ घालत आहे़ त्यामुळे बाजारातून मोठ्या प्रमाणावर गव्हाची विक्री होत आहे़

About three thousand tonnes of onion wheat in Jalgaon arrivals | जळगावात सुमारे तीन हजार टन परप्रांतीय गव्हाची आवक

जळगावात सुमारे तीन हजार टन परप्रांतीय गव्हाची आवक

राम जाधव ल्ल जळगाव
यावर्षी गव्हाचे उत्पादन कमी आले असले, तरी त्याच्या भावात जास्त वाढ झालेली नाही़ राजस्थान, गुजरात व मध्यप्रदेशातून आलेला गहू ग्राहकांना भुरळ घालत आहे़ त्यामुळे बाजारातून मोठ्या प्रमाणावर गव्हाची विक्री होत आहे़
अनेक जण मे अखेरपर्यंत गव्हाची खरेदी करून त्याला स्वच्छ करून त्याची वर्षभरासाठी साठवणूक करतात़ त्यामुळे या महिन्यात मोठ्या प्रमाणावर धान्य बाजारात आर्थिक उलाढाल होत असते़ ज्वारी व बाजरीपेक्षा गव्हालाच जास्त मागणी मिळत आहे़ तसेच तांदळाचीही खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे़
गेल्या २५ दिवसांच्या उलाढालीनुसार अदमासे तीन हजार टनापेक्षा जास्त गव्हाची आवक जिल्ह्यात झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद लाठी यांनी दिली़ जिल्ह्यातील सध्याच्या विक्रीमध्ये हलक्या प्रतीचा असल्यामुळे साधारणत: १० टक्के वाटा फक्त राज्यातील गव्हाचा आहे, तर उर्वरित सर्व गहू हा परराज्यातून आणला जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले़ गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतून शहरासह ग्रामीण भागातीलही नागरिकांची खरेदी सुरू आहे़

४यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट व अवकाळी पावसामुळे गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ त्यातच जे उत्पादन हाती आले, त्याचीही प्रत खूपच खालावलेली आहे़ हा गहू खाण्यास बेचव लागत असल्यामुळे ग्राहक त्याला पसंती देत नाहीत़ त्या मालाला १२०० ते १३०० च्या दरम्यान भाव मिळत आहे़ त्यामुळे दुसऱ्या राज्यातून आलेल्या गव्हाला ग्राहक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत़

Web Title: About three thousand tonnes of onion wheat in Jalgaon arrivals