Lokmat Money > बिझनेस न्यूज > पान १/हनुमानाच्या नावे आधारकार्ड

पान १/हनुमानाच्या नावे आधारकार्ड

हनुमानाच्या नावे आधारकार्ड!

By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:56+5:302014-09-11T22:30:56+5:30

हनुमानाच्या नावे आधारकार्ड!

Aadhaar card in the name of page 1 / Hanuman | पान १/हनुमानाच्या नावे आधारकार्ड

पान १/हनुमानाच्या नावे आधारकार्ड

ुमानाच्या नावे आधारकार्ड!
गदाधारी फोटो व मोबाईल नंबरही
जयपूर : राजस्थानच्या सीकर जिल्ह्याच्या दांतारामगड टपाल विभागामध्ये पवनपुत्र आणि श्रीराम भक्त हनुमान यांच्यानावे आधारकार्ड बनून आले आहे़ मात्र अद्याप हे आधार कार्ड स्वीकारणारा कुणीही समोर आलेला नाही़
हनुमानजी, पवन पुत्र, वॉर्ड क्रमांक ६, पंचायत समितीजवळ दांतारामगड, जिल्हा सिकर, राजस्थान, असा पत्ता या आधारकार्डवर नमूद आहे़बेंगळुरूयेथून ते तयार होऊन आले आहे़ पोस्टमन गेल्या चार पाच दिवसांपासून या पत्त्याचा शोध घेत फिरत आहे़ मात्र अद्यापही त्याला हनुमानजी गवसलेले नाहीत!
आधारकार्डवर हनुमानजीचे गदा हातात घेतलेले छायाचित्र आहे़ जन्मतारीख म्हणून १ जानेवारी १९५९ ही तारीख नोंदवली आहे़ विशेष म्हणजे, ९६८०२७७४४४ हा मोबाईल क्रमांकही नोंदवलेला आहे़ भगवान हनुमानाचे छायाचित्र असलेल्या या आधारकार्डाचा क्रमांक २०९४७०५१९५४१ आहे़ कार्डधारकाच्या स्वाक्षरीच्या ठिकाणी अंगठ्याचा ठसा आहे़
बेंगळुरूवरून १४ ऑगस्ट २०१४ रोजी हे आधारकार्ड पोस्ट करण्यात आले होते़ दांतारामगड टपाल विभागाला ते ६ सप्टेंबरला पोहोचले़ पोस्टमनने सलग तीन चार दिवस शोध घेतल्यावरही पत्ता न मिळाल्याने अखेर हे पाकिट उघडण्याचा निर्णय घेतला गेला आणि आतील भगवान हनुमानाच्या नावे असलेले हे आधारकार्ड पाहून सर्वच अवाक झाले.
आधारकार्डावरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो कायम स्वीच ऑफ दाखवत आहे़ आता हनुमानजींचे हे आधारकार्ड पुन्हा बेंगळुरूच्या पत्त्यावर परत पाठवले जाणार आहे़(वृत्तसंस्था)

Web Title: Aadhaar card in the name of page 1 / Hanuman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.