Lokmat Money > बिझनेस न्यूज > पॉन्झी योजनांत नागरिकांचे अडकले ८० हजार कोटी

पॉन्झी योजनांत नागरिकांचे अडकले ८० हजार कोटी

अवाजवी व्याजदराचा मोबदला देणाऱ्या, भूलभुलैय्या अर्थात ज्यांची गणना पॉन्झी योजनांत होते, अशा योजनांचा फटका देशभरातील सहा कोटी लोकांना बसला

By admin | Updated: June 17, 2015 03:35 IST2015-06-17T03:35:10+5:302015-06-17T03:35:10+5:30

अवाजवी व्याजदराचा मोबदला देणाऱ्या, भूलभुलैय्या अर्थात ज्यांची गणना पॉन्झी योजनांत होते, अशा योजनांचा फटका देशभरातील सहा कोटी लोकांना बसला

80 thousand crores of people stuck in Ponzi schemes | पॉन्झी योजनांत नागरिकांचे अडकले ८० हजार कोटी

पॉन्झी योजनांत नागरिकांचे अडकले ८० हजार कोटी

मुंबई : अवाजवी व्याजदराचा मोबदला देणाऱ्या, भूलभुलैय्या अर्थात ज्यांची गणना पॉन्झी योजनांत होते, अशा योजनांचा फटका देशभरातील सहा कोटी लोकांना बसला असून यामध्ये तबब्ल ८० हजार कोटी रुपये अडकले असल्याची माहिती पुढे आली आहे. आर्थिक गुप्तचर यंत्रणा आणि कस्टम विभागाच्या राष्ट्रीय अकादमीने केलेल्या एका अभ्यासाद्वारे ही माहिती उजेडात आली आहे.
गेल्या दशकभरातील ही आकडेवारी असून, वास्तविक अशा योजनांबद्दल सातत्याने जनजागृती मोहिम राबविली जात असली तरी आजही अशा योजनांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. सहारा, केबीसी, अश्वमेश, सारदा अशा अनेक योजनांत हजारो कोटी रुपये अडकले आहेत.
पॉन्झी योजना रोखण्यासाठी भांडवली बाजार नियामक संस्था अर्थात सेबीने कितीही प्रयत्न केले असले तरी, दिवसाकाठी एक नवी योजना जन्माला येताना दिसत
आहे.
गुंतवणुकीची कोणताही योजना ही सेबीकडे नोंदणी करून सेबीची मान्यता घेणे गरजेचे आहेत. मात्र तरीही सरसकट नोंदणी न होता लहान गावातून आणि मोठ्या शहरांतून आजही अनेक योजना राबविल्या जात आहेत. एसएमएसच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोहात पाडणाऱ्या अनेक फसव्या योजनांच्या विरोधात सोमवारीच सेबीने कारवाईचा बडगा उगारला आहे. विविध पॉन्झी योजनांमुळे फसवणूक करणाऱ्यांचे फावले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 80 thousand crores of people stuck in Ponzi schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.