Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिला बँक उघडणार मार्चपर्यंत ८० शाखा

महिला बँक उघडणार मार्चपर्यंत ८० शाखा

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भारतीय महिला बँक मार्च २०१५ पर्यंत देशभरात ८० शाखा सुरू करणार आहे. यापैकी २० शाखा ग्रामीण भागात उघडण्याचा बँकेचा मानस आहे.

By admin | Updated: January 12, 2015 23:32 IST2015-01-12T23:32:26+5:302015-01-12T23:32:26+5:30

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भारतीय महिला बँक मार्च २०१५ पर्यंत देशभरात ८० शाखा सुरू करणार आहे. यापैकी २० शाखा ग्रामीण भागात उघडण्याचा बँकेचा मानस आहे.

80 bank branches open till March | महिला बँक उघडणार मार्चपर्यंत ८० शाखा

महिला बँक उघडणार मार्चपर्यंत ८० शाखा

भोपाळ : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भारतीय महिला बँक मार्च २०१५ पर्यंत देशभरात ८० शाखा सुरू करणार आहे. यापैकी २० शाखा ग्रामीण भागात उघडण्याचा बँकेचा मानस आहे.
भारतीय महिला बँक अर्थात बीएमबीच्या पहिल्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका उषा अनंतसुब्रमण्यम यांनी सांगितले की, मार्च २०१५ पर्यंत बँकेने ८० शाखा उघडण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यापैकी २० शाखा ग्रामीण भागात सुरू केल्या जाणार आहेत. भोपाळमध्ये बँकेच्या पहिल्या शाखेच्या उद्घाटनानिमित्ताने त्या येथे आल्या होत्या. ही बँकेची देशातली ३९ वी शाखा आहे.
बँकेने यापूर्वी मध्यप्रदेशात इंदोर येथे शाखा सुरू केली असून लवकरच उज्जैन येथे एक शाखा उघडली जाणार आहे. बँकेने यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, रविवारी बंगळुरू येथे बँकेची ४० वी शाखा सुरू झाली. बँकेद्वारा आगामी काळात सुरत, विजयवाडा, जमशेदपूर व नागपूर येथेही शाखा सुरू केली जाणार होती. लवकरच मोबाईल बँकिं ग सेवा सुरू होईल. मोबाईल बँकिंगमध्ये अनेक अनोख्या सुविधा ग्राहकांना मिळतील.

Web Title: 80 bank branches open till March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.