नवी दिल्ली : बाजारात नरमी असली तरी आकर्षक सौदे आणि आक्रमक मार्केटिंग या बळावर यंदा आॅनलाईन शॉपिंग ७८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. असोचेम-पीडब्ल्यूसी यांनी केलेल्या संयुक्त अभ्यासात ही माहिती समोर आली.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार, यंदा बाजारात नरमी आहे. उठाव कमी आहे. तरीही आॅनलाईन शॉपिंगकडे लोक वळताना दिसत आहेत. २0१६ मध्ये त्यात ७८ टक्क्यांची वाढ होईल. २0१५ मध्ये आॅनलाईन शॉपिंग ६६ टक्क्यांनी वाढली होती. कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत, तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून पुस्तकांपर्यंत सर्वच वस्तूंची खरेदी आता आॅनलाईन करणे शक्य झाल्याने या क्षेत्राचा आवाका वाढला आहे. त्यामुळे वृद्धी चांगली आहे. विविध सवलतींमुळे आॅनलाईन खरेदीकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. असोचेम पीडब्ल्यूसीने अहवालात म्हटले की, २0१५ मध्ये सुमारे ५.५ कोटी ग्राहकांनी आॅनलाईन खरेदी केली. यंदा लॉजिस्टिक, ब्रॉडबँक आणि इंटरनेट यांच्याशी संबंधित नवनवी उपकरणे आली आहेत. पायाभूत सोयीही अधिक चांगल्या झाल्या आहेत.
७८ टक्क्यांनी वाढणार आॅनलाईन शॉपिंग
बाजारात नरमी असली तरी आकर्षक सौदे आणि आक्रमक मार्केटिंग या बळावर यंदा आॅनलाईन शॉपिंग ७८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे
By admin | Updated: March 21, 2016 02:32 IST2016-03-21T02:32:51+5:302016-03-21T02:32:51+5:30
बाजारात नरमी असली तरी आकर्षक सौदे आणि आक्रमक मार्केटिंग या बळावर यंदा आॅनलाईन शॉपिंग ७८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे
_ns.jpg)