मुंबई : शेअर बाजारात गेल्या महिन्यांत निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांतूनही मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेतल्याचे दिसून आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या महिनाभरात सुमारे ७३ हजार कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इक्विटी योजनांचा समावेश आहे.
इक्विटी, डेट या योजनांतून प्रामुख्याने पैसे काढून घेण्याकडे गुंतवणूकदारांचा कल होता असे या संदर्भात उपलब्ध माहितीतून दिसते. मार्चच्या महिन्यांत ७३ हजार कोटी रुपये काढले गेले असून त्याच्या तुलनेत गुंतवून झालेल्या रकमेचे प्रमाण किरकोळ आहे. ३३ हजार कोटी रुपयांच्या आसपास गुंतवणूक झाली आहे. दर महिन्याला म्युच्युअल फंडात आणि पर्यायाने शेअर बाजारात हजारो कोटी रुपयांचा उलाढाल होत असली तरी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत होणारी उलाढाल अधिक महत्वाची मानली जाते. यामुळे बाजाराचा कल आणि विविध क्षेत्रांतील घडामोडींचा बऱ्यापैकी अंदाज येतो. अनेक लोक कर वाचविण्यासाठी विविध योजनांत गुंतवणूक करणारे लोक , त्या गुंतवणुकीसाठी एक रकमी पैसे भरणा करावा लागत असल्याने तो उभा करण्यासाठी वर्षभर एसआयपीच्या माध्यमातून पैसे गुंतवित असतात. त्यामुळे तो पैसा म्युच्युअल फंडातून काढून घेण्याचे प्रमाणही लक्षणीय असते. (प्रतिनिधी)
मार्च २०१५ मध्ये म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत असलेल्या ११ लाख ८८ हजार कोटी रुपयांच्या तुलनेत मार्च २०१६ मध्ये म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखाली एकूण १३ लाख ५३ हजार कोटी रुपये इतकी मालमत्ता होती.
म्युच्युअल फंडातून काढले ७३ हजार कोटी
शेअर बाजारात गेल्या महिन्यांत निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांतूनही मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेतल्याचे दिसून आले आहे.
By admin | Updated: April 12, 2016 02:51 IST2016-04-12T02:51:01+5:302016-04-12T02:51:01+5:30
शेअर बाजारात गेल्या महिन्यांत निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांतूनही मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेतल्याचे दिसून आले आहे.
