Lokmat Money > बिझनेस न्यूज > ७०० मेगॅहर्टझ् बँडचा लिलाव दूरसंचार कंपन्यांना तूर्त नको

७०० मेगॅहर्टझ् बँडचा लिलाव दूरसंचार कंपन्यांना तूर्त नको

प्रिमियम ७०० मेगाहर्टझ् बँडच्या स्पेक्ट्रमचा लिलाव तूर्त करू नका, असे आवाहन एअरटेल आणि आयडिया यासारख्या प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी ‘ट्राय’ला केले आहे

By admin | Updated: December 25, 2015 01:21 IST2015-12-25T01:21:54+5:302015-12-25T01:21:54+5:30

प्रिमियम ७०० मेगाहर्टझ् बँडच्या स्पेक्ट्रमचा लिलाव तूर्त करू नका, असे आवाहन एअरटेल आणि आयडिया यासारख्या प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी ‘ट्राय’ला केले आहे

700 MHz band is not auctioned for telecom companies | ७०० मेगॅहर्टझ् बँडचा लिलाव दूरसंचार कंपन्यांना तूर्त नको

७०० मेगॅहर्टझ् बँडचा लिलाव दूरसंचार कंपन्यांना तूर्त नको

नवी दिल्ली : प्रिमियम ७०० मेगाहर्टझ् बँडच्या स्पेक्ट्रमचा लिलाव तूर्त करू नका, असे आवाहन एअरटेल आणि आयडिया यासारख्या प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी ‘ट्राय’ला केले आहे. ही सेवा देण्यासाठी आवश्यक ती उपकरणे नाहीत, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जियो नेही सल्ला देताना या बँडच्या लिलावापूर्वी दोन वर्षांपर्यंत परिस्थितीचे आकलन करण्याची विनंती केली आहे. रिलायन्स जियोने अजून आपली ४-जी सेवा सुरू केलेली नाही.
रिलायन्स जिओ इन्फोकॉलने पुढील टप्प्यातील स्पेक्ट्रम लिलावासाठी स्पेक्ट्रम मूल्याबाबत ट्रायच्या सूचनापत्राच्या उत्तरात म्हटले आहे की, आताच ७०० मेगाहर्टझ् बँडच्या स्पेक्ट्रमचा लिलाव करणे योग्य ठरणार नाही. दोन वर्षांच्या आकर्षणानंतरच याबाबत निर्णय घ्यावा. ‘ट्राय’च्या पत्रानुसार ७०० मेगाहर्टझ्मध्ये मोबाईल सेवांवरील खर्च २१०० मेगाहर्टझ् बँडच्या तुलनेत ७० टक्क्यांनी कमी राहणार आहे.
दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी भारतीय एअरटेलने म्हटले आहे की, ७०० मेगाहर्टझ्मध्ये तात्काळ लिलावामुळे स्पेक्ट्रम कित्येक वर्षे वापराविना पडून राहील आणि उद्योगांचा पैसाही अडकून पडेल. या स्पेक्ट्रमसाठी लागणारी यंत्रणा विकसित झाल्यानंतरच लिलाव करावा. वोडाफोनने म्हटले आहे की, या बँडमध्ये व्यवस्था अजून विकसित होत आहे. लिलावाच्या संदर्भात मूल्यांकन, आरक्षित मूल्य लागू करण्याची प्रतिबद्धता याबाबत सतर्कता बाळगली पाहिजे.

Web Title: 700 MHz band is not auctioned for telecom companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.