मुंबई : गुरुवारी ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात शेअर बाजारांची मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९.३६ टक्क्यांनी घसरला. या वर्षभरात गुंतवणूकदारांचे तब्बल ७ लाख कोटी रुपये बुडाले. विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्याचा फटका बाजाराला बसला.
वर्षातील प्रत्येक व्यावसायिक सत्रात गुंतवणूकदारांना २,७00 कोटी रुपये गमवावे लागले. या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी मात्र सेन्सेक्स ३.२८ टक्क्यांनी वाढून २५,३४१.८६ अंकांवर बंद झाला.
व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३.२0 अंकांनी अथवा 0.0४ टक्क्यांनी वाढून ७,७३८.४0 अंकांवर बंद झाला. हे आर्थिक वर्ष सरत असताना मार्च महिन्यात तेजी परतल्याने वातावरण आशादायी आहे. मार्चमध्ये
सेन्सेक्स १0.१७ टक्क्यांनी म्हणजेच २,३३९ अंकांनी वाढला. राष्ट्रीय
शेअर बाजाराचा निफ्टीही १0.७५ टक्क्यांनी म्हणजेच ७५१.३५ अंकांनी वाढला.
शेअर बाजारात बुडाले ७ लाख कोटी रुपये
गुरुवारी ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात शेअर बाजारांची मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९.३६ टक्क्यांनी घसरला. या वर्षभरात गुंतवणूकदारांचे तब्बल ७ लाख कोटी
By admin | Updated: April 1, 2016 02:07 IST2016-04-01T02:07:15+5:302016-04-01T02:07:15+5:30
गुरुवारी ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात शेअर बाजारांची मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९.३६ टक्क्यांनी घसरला. या वर्षभरात गुंतवणूकदारांचे तब्बल ७ लाख कोटी
