मुंबई : प्रॉव्हिडंट विभागाकडे जमा असलेल्या एकूण निधीपैकी ५ ते १५ टक्के रक्कम भांडवली बाजारात गुंतविण्याची मुभा केंद्र सरकारने दिल्यानंतर, ३१ मार्च २०१६पर्यंत विभागाने सुमारे ६५७७ कोटी रुपये गुंतविले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून विभागाला भांडवली बाजारात पैसे गुंतविण्याची मुभा मिळाली होती. परंतु, भांडवली बाजारातील चढउताराचा फटका कर्मचाऱ्यांच्या संचिताला बसू नये, याकरिता ५ ते १५ टक्के रक्कम गुंतविण्याची मुभा देण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, भांडवली बाजारातील गुंतवणुकीसाठी प्रॉव्हिडंट फंड विभागाने एक्स्जेंज ट्रेडेड फंडाला पसंती दिली आहे.
ही सर्वच रक्कम या ईटीएफमध्ये गुंतविली असून, कोणत्याही कंपनीत वैयक्तिकरीत्या गुंतवणूक करणे टाळले आहे. चालू आर्थिक वर्षात विभागातर्फे होणाऱ्या गुंतवणुकीकडे बाजाराचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)
प्रॉव्हिडंट फंडाचे शेअर बाजारात ६५७७ कोटी
प्रॉव्हिडंट विभागाकडे जमा असलेल्या एकूण निधीपैकी ५ ते १५ टक्के रक्कम भांडवली बाजारात गुंतविण्याची मुभा
By admin | Updated: April 30, 2016 05:19 IST2016-04-30T05:19:34+5:302016-04-30T05:19:34+5:30
प्रॉव्हिडंट विभागाकडे जमा असलेल्या एकूण निधीपैकी ५ ते १५ टक्के रक्कम भांडवली बाजारात गुंतविण्याची मुभा
