गेशोत्सवात ६५ लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त यवतमाळ : गणेशोत्सव काळात अन्न व औषधी प्रशासन विभागाने विशेष तपासणी मोहिमेत राज्यभरातून तब्बल ६५ लाख रुपये किंमतीचा भेसळयुक्त खवा-मावा, मिठाई जप्त केली आहे. गौरी-गणेशोत्सवात दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. भाविकांची पेढे, मिठाईची मागणी लक्षात घेता महाराष्ट्रात परप्रांतातून भेसळयुक्त खव्याचा पुरवठा केला जात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. भेसळयुक्त खव्याचा प्रसाद खाल्ल्याने विषबाधा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी २६ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत खवा-मावा, मिठाईचे ४३६ नमुने घेतले. भेसळीच्या संशयावरून ३४ किलो ९७६ ग्रॅम खवा जप्त करण्यात आला. जप्त केलेला खवा व मिठाईची किंमत ६५ लाख ७३ हजार ५३८ रुपये एवढी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़विभागनिहाय जप्त केलेला खवा (रुपयांमध्ये) बृहन्मुंबई - ४ लाख ६८ हजार ठाणे - १० लाख ६५ हजार पुणे - ३९ लाख ४२ हजार नाशिक - ५ लाख ९६ हजारऔरंगाबाद - २लाख ८४ हजार अमरावती - १ लाख १२ हजार नागपूर - १लाख चार हजाऱ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ कोटअन्न निरीक्षकांच्या मोहिमेत संशयित भेसळयुक्त खवा, मिठाई जप्त करण्यात आली. त्याचा अहवाल येताच संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. आगामी नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या काळातही ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जाईल. - पुरुषोत्तम भापकर, आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन, मुंबई.
गणेशोत्सवात ६५ लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त
गणेशोत्सवात ६५ लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त
By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:53+5:302014-09-11T22:30:53+5:30
गणेशोत्सवात ६५ लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त
