Lokmat Money > बिझनेस न्यूज > ६१ हजार धनाढ्य भारतीय झाले विदेशी

६१ हजार धनाढ्य भारतीय झाले विदेशी

वाढते कर, मुलांचे शिक्षण आणि इतर कारणांमुळे गेल्या १४ वर्षांत भारतातील ६१ हजार कोट्यधीश लोकांनी विदेशी वाट धरली, असे न्यू वर्ल्ड वेल्थ

By admin | Updated: July 26, 2015 22:59 IST2015-07-26T22:57:43+5:302015-07-26T22:59:25+5:30

वाढते कर, मुलांचे शिक्षण आणि इतर कारणांमुळे गेल्या १४ वर्षांत भारतातील ६१ हजार कोट्यधीश लोकांनी विदेशी वाट धरली, असे न्यू वर्ल्ड वेल्थ

61 thousand rich Indians became foreigners | ६१ हजार धनाढ्य भारतीय झाले विदेशी

६१ हजार धनाढ्य भारतीय झाले विदेशी

नवी दिल्ली : वाढते कर, मुलांचे शिक्षण आणि इतर कारणांमुळे गेल्या १४ वर्षांत भारतातील ६१ हजार कोट्यधीश लोकांनी विदेशी वाट धरली, असे न्यू वर्ल्ड वेल्थ अ‍ॅण्ड एलआयओ ग्लोबलच्या संयुक्त अहवालात म्हटले आहे.
२१ व्या शतकाच्या सुरुवातीला दुसऱ्या देशाच्या नागरिकत्वासाठी अर्ज आणि स्थानांतर करण्याचे प्रमाण वाढले. २००० ते २०१४ या दरम्यान भारतातील ६१ हजार कोट्यधीश व्यक्तींनी विदेशाची वाट धरली. या दरम्यान, चीनमधून ९१ हजार कोट्यवधी व्यक्ती विदेशात स्थानांतरित झाल्या.
भारतीय कोट्यधीश व्यक्ती मुख्यत्वे अमेरिका, ब्रिटन आणि आॅस्ट्रेलियाला पसंती देतात, तर चीनमधील कोट्यधीश अमेरिका, हाँगकाँग, सिंगापूर आणि ब्रिटनमध्ये वास्तव्यास जातात.

Web Title: 61 thousand rich Indians became foreigners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.