Lokmat Money > बिझनेस न्यूज > ६0 लाख टन डाळींचा यंदा तुटवडा

६0 लाख टन डाळींचा यंदा तुटवडा

बहुसंख्य भारतीयांच्या जेवणात महत्त्वाचे स्थान असलेल्या डाळींचे भाव अवकाळी पावसामुळे प्रचंड कडाडले आहेत. अवकाळी पावसामुळे २२ लाख ८० हजार

By admin | Updated: June 3, 2015 00:02 IST2015-06-03T00:02:07+5:302015-06-03T00:02:07+5:30

बहुसंख्य भारतीयांच्या जेवणात महत्त्वाचे स्थान असलेल्या डाळींचे भाव अवकाळी पावसामुळे प्रचंड कडाडले आहेत. अवकाळी पावसामुळे २२ लाख ८० हजार

60 lakh tonnes of pulses this year | ६0 लाख टन डाळींचा यंदा तुटवडा

६0 लाख टन डाळींचा यंदा तुटवडा

लखनौ : बहुसंख्य भारतीयांच्या जेवणात महत्त्वाचे स्थान असलेल्या डाळींचे भाव अवकाळी पावसामुळे प्रचंड कडाडले आहेत. अवकाळी पावसामुळे २२ लाख ८० हजार टन रबी पिकाची हानी झाली आहे. पर्यायाने यावर्षी डाळींची मागणी आणि पुरवठ्यात तब्बल ६० लाख टनांचे अंतर राहील असा अंदाज आहे. उद्योग मंडळ असोचेमच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
असोचेमच्या आर्थिक संशोधन विभागाने केलेल्या या पाहणीत रबी हंगामात येणाऱ्या डाळींचा वाटा देशात दरवर्षीच्या एकूण १ कोटी ९० लाख टन डाळ उत्पादनात ६५ टक्के एवढा आहे. खरिपातील डाळींच्या उत्पादनाचा वाटा २५ टक्के आहे. देशात डाळींची एकूण मागणी ही २ कोटी २० लाख टनांची आहे. असोचेमचे राष्ट्रीय महासचिव डी. एस. रावत यांनी या अहवालात म्हटले आहे की, मध्यप्रदेशात देशातील सगळ्यात जास्त डाळींचे उत्पादन होते. त्यानंतर महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये. हवामान आणि वार्षिक उत्पादनानुसार ही राज्ये एकदुसऱ्याच्या मागे-पुढे असतात.
या राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांची खूप हानी झाली. सध्याच्या आर्थिक वर्षात डाळींची आयात सरकारच्या अंदाजापेक्षाही जास्त झालेली आहे. आयात डाळीचा जास्त वाटा कॅलेंडर वर्षातील दुसऱ्या ६ महिन्यांमध्ये आला आहे.
 

 

Web Title: 60 lakh tonnes of pulses this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.