नवी दिल्ली : भारतातील १७ लाख नोंदणीकृत कंपन्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त म्हणजे सुमारे ५.३५ लाख कंपन्या आॅक्टोबर अखेरपर्यंत बंद झाल्या आहेत, अशी माहिती ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे.
मनी लाँड्रिंगसाठी शेल कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे समोर आल्यानंतर सरकारने या कंपन्यांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेचा परिणाम म्हणून बनावट कंपन्या मोठ्या प्रमाणात बंद पडल्या आहेत.
३१ आॅक्टोबरच्या आकडेवारीनुसार आता देशात फक्त ११.३० लाख अधिकृत कंपन्या शिल्लक आहेत. कोणताही व्यवसाय न करणाºया २.२४ लाख कंपन्यांची नोंदणी कंपनी व्यवहार मंत्रालयाने रद्द केली आहे.
मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ३१ आॅक्टोबर २०१७पर्यंत नोंदणीकृत कंपन्यांची संख्या १७ लाख ०४ हजार ३१९ होती. त्यापैकी ११ लाख ३० हजार ७८४ कंपन्या सक्रिय आहेत. सुमारे ५.३५ लाख कंपन्या बंद झाल्या आहेत, तर १,१२३ कंपन्या अकार्यरत स्वरूपाच्या आहेत. तसेच ५,९५७ कंपन्या अवसायनात निघाल्या असून, ३१ हजार ६६६ कंपन्या नोंदणी रद्द होण्याच्या प्रक्रियेत आहेत.
बंद करण्यात आलेल्या ५,३४,६७४ कंपन्यांपैकी १०,४४३ कंपन्या एकतर अवसायानात निघाल्या वा विसर्जित करण्यात आल्या असून, ४,९२,७३५ कंपन्या कार्यरतच नव्हत्या. त्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच १९,९८४ कंपन्या अन्य कंपन्यांत विलीन केल्या आहेत. ६,७१९ कंपन्या एलएलपीमध्ये (लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप) रूपांतरित केल्या आहेत.
त्याचप्रमाणे ४,७९३ कंपन्या एलएलपीत रूपांतरित करून विसर्जित करण्यात आल्या आहेत.
सेवा क्षेत्रात सर्वाधिक कंपन्या
सक्रिय कंपन्यांपैकी सेवाक्षेत्रातील कंपन्यांची संख्या
३.३४ लाख आहे. त्याखालोखाल २.३० लाख कंपन्या वस्तू उत्पादन क्षेत्रात, १.५० लाख कंपन्या व्यापार क्षेत्रात आणि १.०३ लाख कंपन्या बांधकाम क्षेत्रात आहेत.
सक्रिय कंपन्यांपैकी सेवाक्षेत्रातील कंपन्यांची संख्या
३.३४ लाख आहे. त्याखालोखाल २.३० लाख कंपन्या वस्तू उत्पादन क्षेत्रात, १.५० लाख कंपन्या व्यापार क्षेत्रात आणि १.०३ लाख कंपन्या बांधकाम क्षेत्रात आहेत.
आॅक्टोबर २०१५ ते आॅक्टोबर २०१७ या काळातील विश्लेषणावरून आढळून आले की, एप्रिल २०१६मध्ये सर्वाधिक कमी ३,९९४ कंपन्यांची नोंदणी झाली होती. आॅक्टोबर २०१७मध्ये नोंदणी झालेल्या कंपन्यांचे एकूण भागभांडवल १,३९४.६१ कोटी रुपये होते.
५.३५ लाख कंपन्यांचे शटर बंद, शेल कंपन्यांवरील कारवाई; सव्वा दोन लाखांची नोंदणी रद्द
भारतातील १७ लाख नोंदणीकृत कंपन्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त म्हणजे सुमारे ५.३५ लाख कंपन्या आॅक्टोबर अखेरपर्यंत बंद झाल्या आहेत, अशी माहिती ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:00 IST2017-11-28T00:54:47+5:302017-11-28T01:00:08+5:30
भारतातील १७ लाख नोंदणीकृत कंपन्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त म्हणजे सुमारे ५.३५ लाख कंपन्या आॅक्टोबर अखेरपर्यंत बंद झाल्या आहेत, अशी माहिती ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे.
