मुंबई : बनावट कंपन्यांच्या मार्फत काळा पैसा शेअर बाजारात वळविल्याच्या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सेबीने आता कारवाईचा बडगा उगारला असून तब्बल ९०० कंपन्यांना भांडवली बाजारात व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कंपन्यांवर बंदीएवढीच या कारवाईची व्याप्ती असून या प्रकरणात सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांची करचोरी झाल्याचा अंदाज असून त्याचीही सखोल चौकशी करण्यासंदर्भात सेबीने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला यासंदर्भात सुचित केले आहे.
सेबीचे अध्यक्ष यु.बी.सिन्हा यांनीच या कारवाईची माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाजारात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची कुणकुण सेबीला लागली होती. त्या अनुषंगाने अनेक कंपन्यांच्या व्यवहारावर पाळत ठेवण्यात आली होती. ठोस पुरावे हाती लागल्यानंतरच कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले.
ज्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे, त्या कंपन्या केवळ आणि केवळ फक्त घोटाळा करण्यासाठी किंवा काळे पैसे पांढरे करण्यासाठीच बाजारात आला असल्याचा निष्कर्ष काढता येईल, इतके ठोस पुरावे
या संदर्भात हाती लागल्याचे ते म्हणाले.
या कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काळा पैसाधारक व्यक्तीने या कंपन्यांना संपर्क केल्यानंतर हा पैसा एकतर छोटी कंपनी काढून त्याची प्राथमिक समभाग विक्री करून त्यातच पुन्हा गुंतवणूक करण्याच्या माध्यमातून पांढरा करण्यात आला. (प्रतिनिधी)
५ हजार कोटींच्या संभाव्य करचोरीचा पर्दाफाश
बनावट कंपन्यांच्या मार्फत काळा पैसा शेअर बाजारात वळविल्याच्या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सेबीने आता कारवाईचा बडगा उगारला असून तब्बल ९०० कंपन्यांना
By admin | Updated: July 22, 2015 23:42 IST2015-07-22T23:42:10+5:302015-07-22T23:42:10+5:30
बनावट कंपन्यांच्या मार्फत काळा पैसा शेअर बाजारात वळविल्याच्या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सेबीने आता कारवाईचा बडगा उगारला असून तब्बल ९०० कंपन्यांना
