Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

५० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

देशातील आर्थिक मंदीमुळे चीनमधील एका मोठ्या पोलाद कंपनीने ५० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या चेअरमननी माहिती दिली.

By admin | Updated: March 12, 2016 03:34 IST2016-03-12T03:34:43+5:302016-03-12T03:34:43+5:30

देशातील आर्थिक मंदीमुळे चीनमधील एका मोठ्या पोलाद कंपनीने ५० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या चेअरमननी माहिती दिली.

50 thousand employees will be removed | ५० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

५० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

बीजिंग : देशातील आर्थिक मंदीमुळे चीनमधील एका मोठ्या पोलाद कंपनीने ५० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या चेअरमननी माहिती दिली.
सध्या जगभरात मंदीची लाट असून मंदीमुळे चीनची निर्यात क मालीची प्रभावित झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त क्षमता कमी करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील ‘वूहान आयर्न अ‍ॅण्ड स्टील’ या कंपनीचे प्रमुख मा कू ओछियांग यांनी दिलेल्या या माहितीमुळे देशाची आर्थिक स्थिती स्पष्ट होते. मंदीमुळे आणि नोकरकपातीमुळे देशात सामाजिक अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीन नवीन आर्थिक धोरण स्वीकारण्याची शक्यता पडताळून पाहत आहे.
नॅशनल पीपल्स काँग्रेससमोर बोलताना ते म्हणाले की, कंपनीच्या पोलाद विभागात ८० हजार कर्मचारी असले तरीही त्यापैकी आपण केवळ ३० हजार कर्मचारीच ठेवू शकतो. कदाचित कंपनीतील ४०-५० हजार कर्मचाऱ्यांना अन्य मार्ग स्वीकारावा लागेल. काही दिवसांपूर्वीच चीन सरकारने दीड लाख कामगारांची कपात केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यापाठोपाठ सरकारी मालकीच्या एका प्रमुख कंपनीकडूनही तसेच सुतोवाच झाले आहे.

Web Title: 50 thousand employees will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.