नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव ५० रुपयांनी घटून २७,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात मागणी कमी झाल्याने ही घट नोंदली गेली आहे. चांदीचा भावही १०० रुपयांनी घटून ३७,२०० रुपये प्रतिकिलो राहिला.
जाणकारांच्या मते, जागतिक बाजारात सोन्याच्या भावात घट झाली. परिणामी स्थानिक सराफ्यातही घसरणीचा कल राहिला. गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात भांडवल लावल्यानेही सराफ्यात घसरण दिसून आली. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.३३ टक्क्यांनी घटून १,२०५.२० डॉलर प्रतिऔंस झाला.
दिल्ली बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५० रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,००० रुपये व २६,८०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,६५० रुपयांवर कायम राहिला.
तयार चांदीचा भाव १०० रुपयांनी कमी होऊन ३७,२०० रुपये व साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव २०५ रुपयांनी घटून ३६,५९५ रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५९,००० रुपये व विक्रीकरिता ६०,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याच्या भावात ५० रुपयांची घट
राजधानी नवी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव ५० रुपयांनी घटून २७,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.
By admin | Updated: February 28, 2015 00:08 IST2015-02-28T00:08:57+5:302015-02-28T00:08:57+5:30
राजधानी नवी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव ५० रुपयांनी घटून २७,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.
