नवी दिल्ली : बँकेतर वित्तीय कंपन्यांची स्थिती बिकट होत असून, वाढती थकीत कर्जे, कर्जाच्या व्यवसायात संथ गतीने होत असलेली वाढ आणि कडक निर्बंधांमुळे वित्तपुरवठ्यात होणारी घट यांसारख्या समस्यांना या कंपन्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे या कंपन्यांसाठी कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) पाच कलमी कार्यक्रम सुचविला आहे.
या कार्यक्रमात या कंपन्यांसाठी आवश्यक तेवढा निधीचा पुरवठा वाढणे, सध्याचे थकीत कर्जाचे निकष कायम ठेवणे, या कंपन्यांना सिक्युरिटायजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन आॅफ फिनान्शियल अॅसेट अँड एन्फोर्समेंट आॅफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायद्याखाली आणणे, तसेच पुरेसे भांडवल उपलब्ध करून देणे आणि करविषयक प्रश्न सोडविणे अशा बाबींचा समावेश आहे.
वित्तीय समायोजन आणि अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण होण्याकरिता बँकेतर वित्तीय संस्था देशातील मूलभूत वित्तीय यंत्रणेशी जोडल्या गेल्या पाहिजेत.
याबाबत आवश्यक ते धोरणात्मक बदल केले गेले पाहिजेत, असे सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी म्हटले आहे. पुढील १0 वर्षांसाठी या क्षेत्राला मिळणारी धोरणात्मक दिशा या क्षेत्राच्या वाढीसाठी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
वित्तीय संस्थांसाठी ५ कलमी कार्यक्रम
या कंपन्यांसाठी कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) पाच कलमी कार्यक्रम सुचविला आहे.
By admin | Updated: June 16, 2014 04:13 IST2014-06-16T04:13:11+5:302014-06-16T04:13:11+5:30
या कंपन्यांसाठी कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) पाच कलमी कार्यक्रम सुचविला आहे.
