मुंबई : पाच व्यावसायिक सत्रांच्या घसरणीला ब्रेक लावत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी ४१६ अंकांनी उसळून पुन्हा एकदा २७ हजार अंकांच्या वर गेला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याचे टाळल्यामुळे बाजाराला बळ मिळाले. सेन्सेक्सने दीड महिन्यांतील सर्वांत मोठा लाभ मिळवीत तेजीला चालना दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने काल कर सुधारणांना चालना देण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयकाला हिरवा कंदिल दाखविला. हे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच मांडले जाणार आहे. त्याचाही परिणाम शेअर बाजारात दिसून आला. दुसरीकडे जागतिक बाजारातही तेजीचा कल दिसून आला. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाबरोबरच रशियाई रुबल स्थिरावल्याचा परिणाम जागतिक बाजारांसाठी उपयुक्त ठरला.
सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 पैकी २७ कंपन्यांना तेजीचा लाभ मिळाला. फक्त तीन कंपन्यांचे समभाग घसरले. ४.९१ टक्क्यांच्या वाढीसह भेलने सर्वाधिक लाभ मिळविला. त्यापाठोपाठ हिंदाल्को, गेल इंडिया, मारुती-सुझुकी, एनटीपीसी आणि आयसीआयसीआय बँक यांनी उत्तम वाढ नोंदविली.
५0 कंपन्यांचा समावेश असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीने ८,१00 अंकांचा टप्पा ओलांडला. १२९.५0 अंक अथवा १.६१ टक्क्यांची वाढ नोंदवून निफ्टी ८,१५९.३0 अंकांवर बंद झाला.
आयसीआयसीआय बँक, एलअँडटी, इन्फोसिस, एचडीएफसी, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, आरआरएल, मारुती सुझुकी, एसबीआय, आयटीसी आणि एचडीएफसी या कंपन्यांच्या समभागांनी सेन्सेक्सच्या वाढीतील ३00 अंक दिले.
बाजाराचा एकूण व्याप सकारात्मक राहिला. २,१७२ कंपन्यांच्या समभागांनी तेजी नोंदविली. ६८३ कंपन्यांचे समभाग घसरले. बाजारातील एकूण उलाढाल ३,0१३ कोटी झाली.
आशियाई बाजारांपैकी चीन आणि दक्षिण कोरियातील बाजार घसरणीसह बंद झाले. हाँगकाँग, जपान, सिंगापूर, तैवान येथील बाजार वाढीसह बंद झाले. 0.५१ टक्के ते २.३२ टक्के या दरम्यान वाढीचे प्रमाण होते.
युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रात तेजीचा कल दिसून आला. सीएसी १.८४ टक्के वर चालला होता. डीएएक्स १.८५ टक्के तेजीत होता.
शेअर बाजारातील ५ दिवसांच्या घसरणीला ब्रेक
पाच व्यावसायिक सत्रांच्या घसरणीला ब्रेक लावत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी ४१६ अंकांनी उसळून पुन्हा एकदा २७ हजार अंकांच्या वर गेला.
By admin | Updated: December 19, 2014 04:12 IST2014-12-19T04:12:20+5:302014-12-19T04:12:20+5:30
पाच व्यावसायिक सत्रांच्या घसरणीला ब्रेक लावत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी ४१६ अंकांनी उसळून पुन्हा एकदा २७ हजार अंकांच्या वर गेला.
