ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - रिलायन्स जिओने मोफत इंटरनेट सेवा सुरू केल्यापासून देशातील टेलीकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच चुरस सुरू झाली आहे. भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलने मोबाईल ग्राहकांसाठी 259 रूपयांत 10 जीबी 4 जी इंटरनेटच्या ऑफरची घोषणा केली. नवीन 4 जी स्मार्टफोन घेणा-यांसाठी ही ऑफर असणार आहे अशी माहिती कंपनीकडून बुधवारी देण्यात आली. यामध्ये ग्राहकाला 1 जीबी डेटा हा तात्काळ देण्यात येणार असून उर्वरीत 9 जीबी डेटा MyAirtel App मध्ये जाऊन ग्राहकांना मिळवता येईल. 28 दिवसांसाठी याची व्हॅलिडिटी असणार आहे.
