Lokmat Money > बिझनेस न्यूज > 41 गावात येणार महिलाराज दक्षिण सोलापूर: मंद्रुप, उळे, बोरामणी महिलांकडे

41 गावात येणार महिलाराज दक्षिण सोलापूर: मंद्रुप, उळे, बोरामणी महिलांकडे

दक्षिण सोलापूर: तालुक्यातील 83 ग्रामपंचायतींपैकी 41 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिला विराजमान होणार आहेत. मंद्रुप, उळे, बोरामणी, राजूर, वळसंग, मुळेगाव तांडा या ग्रामपंचायतींवर आगामी काळात महिलांची सरपंचपदी निवड होणार असल्याचे आज काढण्यात आलेल्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीने स्पष्ट झाले आहे. ही सोडत सन 2015 ते 2020 या काळात होणार्‍या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी लागू राहणार आहे.

By admin | Updated: March 28, 2015 01:43 IST2015-03-28T01:43:46+5:302015-03-28T01:43:46+5:30

दक्षिण सोलापूर: तालुक्यातील 83 ग्रामपंचायतींपैकी 41 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिला विराजमान होणार आहेत. मंद्रुप, उळे, बोरामणी, राजूर, वळसंग, मुळेगाव तांडा या ग्रामपंचायतींवर आगामी काळात महिलांची सरपंचपदी निवड होणार असल्याचे आज काढण्यात आलेल्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीने स्पष्ट झाले आहे. ही सोडत सन 2015 ते 2020 या काळात होणार्‍या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी लागू राहणार आहे.

41 will come to the village Mahilaraj South Solapur: Mandrup, Ule, Boraani Mahani | 41 गावात येणार महिलाराज दक्षिण सोलापूर: मंद्रुप, उळे, बोरामणी महिलांकडे

41 गावात येणार महिलाराज दक्षिण सोलापूर: मंद्रुप, उळे, बोरामणी महिलांकडे

्षिण सोलापूर: तालुक्यातील 83 ग्रामपंचायतींपैकी 41 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिला विराजमान होणार आहेत. मंद्रुप, उळे, बोरामणी, राजूर, वळसंग, मुळेगाव तांडा या ग्रामपंचायतींवर आगामी काळात महिलांची सरपंचपदी निवड होणार असल्याचे आज काढण्यात आलेल्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीने स्पष्ट झाले आहे. ही सोडत सन 2015 ते 2020 या काळात होणार्‍या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी लागू राहणार आहे.
सकाळी 11 वाजता दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तथा दक्षिण सोलापूरचे तहसीलदार डी. गंगाथरण यांच्या अध्यक्षतेखाली सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. तालुक्यातून विविध पक्षांचे नेते आणि विद्यमान सरपंच यावेळी उपस्थित होते. आसरा प्राथमिक शाळेतील दुसरीचा विद्यार्थी हर्ष लोंढे याने महिलांसाठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायतीच्या नावांच्या टप्प्याटप्प्याने 41 चिठ्ठय़ा काढल्या. निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय मोहोळे यांनी त्यावरून आरक्षण जाहीर केले. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रथम अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीच्या ग्रामपंचायती निश्चत केल्या. याप्रसंगी संगांयोचे तहसीलदार राजशेखर लिंबारे, नायब तहसीलदार सीमा सोनवणे यांनी सहकार्य केले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, माजी अध्यक्ष सिद्धाराम हेले, यतीन शहा, सेनेचे तालुका प्रमुख गंगाराम चौगुले, रिपाइंचे डी. एन. गायकवाड, काँग्रेसचे राधाकृष्ण पाटील, लक्ष्मण पाटील, राजेंद्र कुलकर्णी, आप्पासाहेब बिराजदार, काशीराम गायकवाड, सुभाष पाटोळे, पंकज चाबुकस्वार, अनिल ननवरे, सुनील कळके, तुकाराम कोळेकर उपस्थित होते.
सरपंच आरक्षण सोडत
अनुसूचित जमाती (महिला-2) : दर्गनहळ्ळी, तीर्थ, अनुसूचित जमाती (2) : मनगोळी, कुसूर-खानापूर, अनुसूचित जाती (महिला-6): शिरवळ (जै.), धोत्री, कारकल, तेलगाव (मं.), फताटेवाडी, वडगाव-शिरपनहळ्ळी, अनुसूचित जाती (6): मंद्रुप-इंदिरा नगर, तोगराळी-गुर्देहळ्ळी, उळे, वडजी, बाळगी, दिंडूर, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला-11): इंगळगी, राजूर, रामपूर, कासेगाव, गंगेवाडी, टाकळी, वळसंग, औज (मं), गावडेवाडी, मुस्ती, बंकलगी, नागरिकांचा मागास प्रवर्ग (11): यत्नाळ, आलेगाव, सादेपूर, हत्तूर-चंद्रहाळ, वांगी, कर्देहळ्ळी, कुंभारी, औराद, संजवाड, हणमगाव, सिंदखेड.
सर्वसाधारण (महिला 22): शंकरनगर, दोड्डी, होनमुर्गी-बिरनाळ, बोरामणी, हत्तरसंग, येळेगाव, बक्षीहिप्परगे, चिंचपूर, बसवनगर, घोडातांडा, निंबर्गी, नांदणी, बोरुळ, होटगी स्टेशन, मुळेगाव तांडा, लवंगी, मद्रे, आहेरवाडी, भंडारकवठे, पिंजारवाडी, कणबस (गं), विंचूर. सर्वसाधारण (23): वडकबाळ, मुळेगाव, कंदलगाव, उळेवाडी, संगदरी, कुरघोट, आचेगाव, माळकवठे, कुडल, तांदूळवाडी, होटगी-सावतखेड, अकोले (मं), बरूर, अंत्रोळी, हिपळे, औज (आ.), गुंजेगाव, शिंगडगाव, लिंबीचिंचोळी, बोळकवठे-बंदलगी, तिल्लेहाळ, वडापूर, वरळेगाव.

Web Title: 41 will come to the village Mahilaraj South Solapur: Mandrup, Ule, Boraani Mahani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.