नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला चैतन्य येण्याच्या आशेने औद्योगिक उत्पादन गेल्या पाच महिन्यांत सर्वाधिक ३.८ टक्के वाढले. उत्पादनात आणि खाण क्षेत्रात सुधारणा झाली व भांडवली वस्तूंना चांगली मागणी असल्यामुळे नोव्हेंबरमध्ये हा सकारात्मक परिणाम झाला.
कारखान्यातील उत्पादनाचे मोजमाप औद्योगिक उत्पादन निर्देशांकानुसार (आयआयपी) केले जाते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते १.३ टक्क्यांनी घटले होते. २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत आयआयपी २.२ टक्के वाढला होता. याच कालावधीत तो गेल्या वर्षी ०.१ टक्केच वाढला होता. २२ पैकी १६ उद्योगसमुहांचे उत्पादन नोव्हेंबरमध्ये वाढले.
औद्योगिक उत्पादनात ३.८% वाढ
अर्थव्यवस्थेला चैतन्य येण्याच्या आशेने औद्योगिक उत्पादन गेल्या पाच महिन्यांत सर्वाधिक ३.८ टक्के वाढले. उत्पादनात आणि खाण क्षेत्रात सुधारणा झाली
By admin | Updated: January 12, 2015 23:48 IST2015-01-12T23:48:17+5:302015-01-12T23:48:17+5:30
अर्थव्यवस्थेला चैतन्य येण्याच्या आशेने औद्योगिक उत्पादन गेल्या पाच महिन्यांत सर्वाधिक ३.८ टक्के वाढले. उत्पादनात आणि खाण क्षेत्रात सुधारणा झाली
