Lokmat Money > बिझनेस न्यूज > पायाभूत सुविधांना हवेत ३१ लाख कोटी !

पायाभूत सुविधांना हवेत ३१ लाख कोटी !

विकसनशील अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्था असा प्रवास करताना आगामी पाच वर्षांत पायाभूत क्षेत्रामध्ये ३१ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज असून यापैकी ७० टक्के रक्कम ही ऊर्जा,

By admin | Updated: December 20, 2015 22:36 IST2015-12-20T22:36:43+5:302015-12-20T22:36:43+5:30

विकसनशील अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्था असा प्रवास करताना आगामी पाच वर्षांत पायाभूत क्षेत्रामध्ये ३१ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज असून यापैकी ७० टक्के रक्कम ही ऊर्जा,

31 lakh crores of infrastructure in the air! | पायाभूत सुविधांना हवेत ३१ लाख कोटी !

पायाभूत सुविधांना हवेत ३१ लाख कोटी !

मुंबई : विकसनशील अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्था असा प्रवास करताना आगामी पाच वर्षांत पायाभूत क्षेत्रामध्ये ३१ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज असून यापैकी ७० टक्के रक्कम ही ऊर्जा, रस्ते आणि शहरी भागातील पायाभूत सुविधा विकासाच्या कामांसाठी खर्च करावी लागेल, असे मत क्रिसिल या अर्थविश्लेषक संस्थेने व्यक्त केले.
असोचेम आणि अग्रगण्य अर्थविश्लेषण संस्था असलेल्या क्रिसिल या दोन प्रमुख संघटनांनी ‘व्हाईट पेपर आॅन इन्फ्रास्ट्रक्चर फायनॅन्सिंग’ या नावे एक अभ्यास अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात या बाबींचा उल्लेख आहे. या अहवालानुसार, नागरी भाग ते शहर असे परावर्तन देशाच्या अनेक भागांत दिसत असून शहरामध्ये परावर्तन होताना मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची आवश्यकता भासणार असल्याचा प्रमुख मुद्दा मांडत, या पायाभूत विकासाच्या निर्मितीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान, आगामी पाच वर्षांतील ३१ लाखांच्या गरजेचा विचार करता प्रतिदिन १७०० कोटी रुपयांची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: 31 lakh crores of infrastructure in the air!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.