Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मंगळयानाची अंतराळात ३०० दिवस पूर्ण

मंगळयानाची अंतराळात ३०० दिवस पूर्ण

चेन्नई : भारताचे महत्त्वाकांक्षी मिशन मंगळयानाची अंतराळात ३०० दिवस पूर्ण झाली असून, ते अंतिम टप्प्यापासून केवळ २३ दिवसांच्या अंतरावर आहे.

By admin | Updated: September 2, 2014 20:10 IST2014-09-02T20:10:01+5:302014-09-02T20:10:01+5:30

चेन्नई : भारताचे महत्त्वाकांक्षी मिशन मंगळयानाची अंतराळात ३०० दिवस पूर्ण झाली असून, ते अंतिम टप्प्यापासून केवळ २३ दिवसांच्या अंतरावर आहे.

300 days in the Marsian plane | मंगळयानाची अंतराळात ३०० दिवस पूर्ण

मंगळयानाची अंतराळात ३०० दिवस पूर्ण

न्नई : भारताचे महत्त्वाकांक्षी मिशन मंगळयानाची अंतराळात ३०० दिवस पूर्ण झाली असून, ते अंतिम टप्प्यापासून केवळ २३ दिवसांच्या अंतरावर आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ही माहिती मायक्रो ब्लॉगिंग साइटवर दिली.
मंगळयानाने मंगळग्रहाच्या दिशेने ६२.२ कोटी किमी अंतर कापले आहे. मंगळयान २२.३३ किमी प्रति सेकंदच्या वेगाने आपल्या लक्ष्याच्या दिशेने जात आहे.
इस्रोने मंगळयान आणि त्याचा पेलोड सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे.
देशाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर ४५० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. गेल्या वर्षी ५ नोव्हेंबरला आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून त्याचे उड्डाण झाले होते. हे यान मंगळग्रहाच्या कक्षेत २४ सप्टेंबरला पोहोचणे अपेक्षित आहे. मंगळयानाने ९० टक्के प्रवास पूर्ण केल्याची माहिती गेल्या आठवड्यात इस्त्रोने दिली होती. मंगळयानावरील लिक्विड इंजिन सुप्तावस्थेत आहे आणि त्याला सुरू करणे मोठे आव्हान असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: 300 days in the Marsian plane