वॉशिंग्टन : भारतातून २०१२ मध्ये ६ लाख कोटी (९४.७६ अब्ज अमेरिकन डॉलर) रुपये काळ्या पैशांच्या रूपाने विदेशात जमा झाले असून, जगात यात भारताचा तिसरा क्रमांक आहे. ग्लोबल फिनान्शियल इंटेग्रिटीने (जीएफआय) ही माहिती दिली. २००३-२०१२ या दहा वर्षांत भारतातून २८ लाख कोटी (४३९.५९ अब्ज अमेरिकन डॉलर) रुपये विदेशात गेले आहेत.
२०१२ मध्ये विदेशात काळा पैसा ठेवण्यात चीन पहिल्या क्रमांकावर (२४९.५७ अब्ज अमेरिकन डॉलर), तर रशिया (१२२.८६ अब्ज अमेरिकन डॉलर) दुसऱ्या क्रमांकावर आहे. जीएफआयने देशाबाहेर जाणारा बेकायदा पैसा या विषयावर २०१४ चा वार्षिक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार २००३ ते २०१२ या कालावधीत विकसनशील देशांतून ६.६ ट्रिलियन (एकावर १८ शून्ये इतकी संख्या) अमेरिकन डॉलरचा बेकायदा पैसा गेला आहे. या पैशांमध्ये याच १० वर्षांत भारतातून विदेशात गेलेले ४३९.५९ अब्ज अमेरिकन डॉलरचा समावेश आहे. या १० वर्षांसाठी भारताचा क्रम चौथा असून पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे चीन (१.२५ ट्रिलियन डॉलर), रशिया (९७३.८६ अब्ज डॉलर) आणि मेक्सिको ( ५१४.२६ अब्ज डॉलर) यांचा आहे. या १० वर्षांची सरासरी काढली तर भारतातून दरवर्षी ४३.९६ अब्ज अमेरिकन डॉलरचा काळा पैसा विदेशात पाठविण्यात आला आहे, असे जीएफआयने म्हटले. एवढ्या प्रचंड काळ्या पैशांचा शोध घेण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीची नियुक्ती केली आहे. एचएसबीसीच्या जिनिव्हा शाखेत खाते असलेल्या भारतीयांच्या ४,४७९ कोटी रुपयांच्या चौकशीसाठी या एसआयटीची स्थापना केली आहे. याशिवाय एसआयटीने भारतात १४,९५८ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता शोधून काढली आहे.
२८ लाख कोटी रुपये गेले भारतातून बाहेर
भारतातून २०१२ मध्ये ६ लाख कोटी (९४.७६ अब्ज अमेरिकन डॉलर) रुपये काळ्या पैशांच्या रूपाने विदेशात जमा झाले
By admin | Updated: December 17, 2014 00:53 IST2014-12-17T00:52:16+5:302014-12-17T00:53:00+5:30
भारतातून २०१२ मध्ये ६ लाख कोटी (९४.७६ अब्ज अमेरिकन डॉलर) रुपये काळ्या पैशांच्या रूपाने विदेशात जमा झाले
