कडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथील कोडोली नागरी सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील सर्वोदय सेवा सोसायटीच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात २६ लाख ७० हजार इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती पंचायत समिती सदस्य अमरसिंह पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी अमरसिंह पाटील म्हणाले, पतसंस्थेला चालूवर्षी २६ लाख ७० हजार रुपयांचा निव्वळ नफ झाला असून, संस्थेकडे २३ कोटी ८० लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने १६ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज वाटले आहे. संस्थेने गुंतवणूक दहा कोटी ११ लाख रुपये केली आहे. चालू वर्षी संस्थेला चांगला नफा झाला असल्याने सभासदांना १२% लाभांश देणार असल्याचेही पाटील यांनी जाहीर केले. आनंद मगदूम यांनी स्वागत केले. विजय जाधव यांनी अहवाल वाचन, तर व्यवस्थापक भगवान पाटील यांनी विषय पत्रिकेतील विषयाचे वाचन केले. अध्यक्ष धीरज पाटील, उपाध्यक्ष धनाजी केकरे, प्रदीप बावणे, संदीप कापरे, रणजित काईगडे, बी. एस. पाटील, जालंदर पाटील, महादेव आजरेकर, मानसिंग पाटील. जी. ए. पाटील, विजय पोतदार, राहुल पाटील, आदी उपस्थित होते. भगवान पाटील यांनी आभार मानले.
चाफोडी नागरी पतसंस्थेस २७ लाखांचा नफा
कोडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथील कोडोली नागरी सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील सर्वोदय सेवा सोसायटीच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात २६ लाख ७० हजार इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती पंचायत समिती सदस्य अमरसिंह पाटील यांनी यावेळी दिली.
By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:25+5:302014-08-25T21:40:25+5:30