Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंडिगो खरेदी करणार २५0 विमाने

इंडिगो खरेदी करणार २५0 विमाने

खाजगी विमान वाहतूक कंपनी इंडिगोने २५0 खरेदी करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. इंडिगो अत्याधुनिक एअरबस ए-३२0 निओ विमाने खरेदी करणार आहे

By admin | Updated: October 16, 2014 05:49 IST2014-10-16T05:49:07+5:302014-10-16T05:49:07+5:30

खाजगी विमान वाहतूक कंपनी इंडिगोने २५0 खरेदी करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. इंडिगो अत्याधुनिक एअरबस ए-३२0 निओ विमाने खरेदी करणार आहे

250 planes to buy indigo | इंडिगो खरेदी करणार २५0 विमाने

इंडिगो खरेदी करणार २५0 विमाने

नवी दिल्ली : खाजगी विमान वाहतूक कंपनी इंडिगोने २५0 खरेदी करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. इंडिगो अत्याधुनिक एअरबस ए-३२0 निओ विमाने खरेदी करणार आहे. २५.५ अब्ज डॉलर म्हणजेच १.५५ लाख कोटी रुपयांचा हा सौदा असून हा जगातील सर्वांत मोठा सौदा ठरला आहे.
२00५ मध्ये इंडिगोने ए-३२0 जातीची १00 विमाने खरेदी केली होती. त्यानंतर २0११ मध्ये कंपनीने १८0 ए-३२0 निओ विमानांच्या खरेदीची आॅर्डर दिली होती. हा सौदा ११ अब्ज डॉलरचा होता. त्यावेळचाही हा सर्वांत मोठा सौदा होता. इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल आणि राहुल भाटिया यांनी एअरबसच्या फ्रान्समधील टॉलौस येथील मुख्यालयात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. एअरबसने जारी केलेल्या माहितीनुसार, यापैकी प्रत्येक विमानाची किंमत १0२.८ दशलक्ष डॉलर आहे. विमानांच्या संख्येच्या दृष्टीने ही सर्वांत मोठी खरेदी आॅर्डर ठरली आहे.

Web Title: 250 planes to buy indigo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.