नवी दिल्ली : ऊर्जा क्षेत्रात आगामी ४-५ वर्षांत २५० अब्ज डॉलर अर्थात १५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची सरकारला आशा आहे. या गुंतवणुकीने ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासोबतच सर्वांना वीज देण्याचे धोरण अमलात आणता येईल. ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी येथे ही माहिती दिली.
जिनेव्हा येथील जागतिक आर्थिक मंच अर्थात डब्ल्यूईएफ आणि भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) याद्वारे आयोजित भारत आर्थिक परिषदेतील एका सत्राला गोयल संबोधित करत होते. २०१९ साली भारतातील एकूण वीज उत्पादन २,००० अब्ज युनिट होईल आणि अधिकतर गुंतवणूक खासगी क्षेत्रातून येईल अशी आशा सरकारला आहे. तसेच सरकारही गुंतवणूक करेल. कोळसा उत्पादन वाढविण्यावर सरकार भर देईल, असे ते म्हणाले.
‘२५0 अब्ज डॉलर गुंतवणूक होणार’
ऊर्जा क्षेत्रात आगामी ४-५ वर्षांत २५० अब्ज डॉलर अर्थात १५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची सरकारला आशा आहे
By admin | Updated: November 7, 2014 04:40 IST2014-11-07T04:40:20+5:302014-11-07T04:40:20+5:30
ऊर्जा क्षेत्रात आगामी ४-५ वर्षांत २५० अब्ज डॉलर अर्थात १५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची सरकारला आशा आहे
