मुंबई : २0१४-१५ या आर्थिक वर्षात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने २५ टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदविली असून २00९-१0 या आर्थिक वर्षापासूनच्या कालखंडातील ही सर्वांत मोठी वार्षिक वाढ ठरली आहे. आज दिवसभराच्या व्यवहारांत मात्र सेन्सेक्सची पीछेहाट झाल्याचे दिसून आले.
वर्ष अखेरचा दिवस असल्यामुळे बाजारात फारसा उत्साह दिसून आला नाही. सेन्सेक्स १८.३७ अंकांनी घसरून २७,९५७.४९ अंकांवर बंद झाला. बाजारातील व्यापक धारणा मात्र मजबूत असल्याची दिसून आली. स्मॉलकॅप आणि मीडकॅप कंपन्यांनी 0.३१ टक्के आणि 0.८८ टक्के वाढ मिळविली. मार्च महिना मात्र सेन्सेक्ससाठी चांगला राहिला नाही. या महिन्यात सेन्सेक्सची ४.८ टक्के पीछेहाट झाली. ही सेन्सेक्सची फेब्रुवारी २0१३ पासूनच्या काळातील सर्वांत वाईट मासिक कामगिरी ठरली.
५0 कंपन्यांच्या समभागावर आधारलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी १.३0 अंकांनी अथवा 0.0२ टक्क्यांनी घसरून ८,४९१ अंकांवर बंद झाला. २0१४-१५ या आर्थिक वर्षात सेन्सेक्स ५,५७१.२२ अंकांनी वाढला. ही वाढ २४.८८ टक्के आहे. ३१ मार्च २0१४ रोजी सेन्सेक्स २२,३८६.२७ अंकांवर होता. ३१ मार्च २0१५ रोजी तो २७,९५७.४९ अंकांवर पोहोचला. त्या आधी ४ मार्च रोजी तो ३0,0२४.७४ अंकांवर म्हणजेच सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. गेल्या वर्षभरात भारतीय कंपन्यांनी ५८,८0१ कोटी रुपयांची कमाई शेअर मार्केटमधून केली. २0१0-११ या वर्षांपासूनची ही सर्वाधिक कमाई ठरली आहे.
याच काळात निफ्टी १,७८६.८0 अंकांनी अथवा २६.६५ टक्क्यांनी वाढून ८,४९१ अंकांवर स्थिरावला. ४ मार्च रोजी तो ९,११९.२0 अंकांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता.
आजच्या सत्रात एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, एलअँडटी, भेल, ओएनजीसी, आयटीसी, इन्फोसिस, टीसीएस, एमअँडएम, हिंदाल्को या कंपन्यांचे समभाग घसरले. आरआयएल, टाटा मोटर्स, सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, मारुती सुझुकी, भारती एअरटेल आणि टाटा पॉवर यांचे समभाग वाढले.
सेन्सेक्सने मिळविली २५ % वार्षिक वाढ
२0१४-१५ या आर्थिक वर्षात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने २५ टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदविली असून २00९-१0 या आर्थिक वर्षापासूनच्या कालखंडातील ही
By admin | Updated: April 1, 2015 01:50 IST2015-04-01T01:50:08+5:302015-04-01T01:50:08+5:30
२0१४-१५ या आर्थिक वर्षात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने २५ टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदविली असून २00९-१0 या आर्थिक वर्षापासूनच्या कालखंडातील ही
