नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांत सार्वजनिक बँकेत ११,०२२ कोटी रुपयांच्या फसवणुकीची २,१६६ प्रकरणे उघडकीस आली आहेत. फसवणुकीचे सर्वाधिक प्रकार पंजाब नॅशनल बँकेतील आहेत.
एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीबाबतची माहिती सार्वजनिक बँका रिझर्व्ह बँकेला देतात. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने २६ सार्वजनिक बँकांतील फसवणुकीच्या प्रकरणांचा आढावा घेतला असता एप्रिल ते डिसेंबर २०१५ या नऊ महिन्यांत फसवणुकीची २१६६ प्रकरणे उघडकीस आली. फसवणुकीचा आकडा ११,०२२ कोटी रुपयांवर पोहोचला. २०१३-१४ मध्ये ७,५४२ कोटी रुपयांच्या फसवणुकीचे २,५९३ प्रकार उघडकीस आले होते. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत दिल्लीतील पंजाब नॅशनल बँकेत २,०३६ कोटींच्या फसवणुकीचे प्रकार घडले.
बँकांतील फसवणुकीचे २,१६६ प्रकार
चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांत सार्वजनिक बँकेत ११,०२२ कोटी रुपयांच्या फसवणुकीची २,१६६ प्रकरणे उघडकीस आली आहेत.
By admin | Updated: March 22, 2015 23:48 IST2015-03-22T23:48:35+5:302015-03-22T23:48:35+5:30
चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांत सार्वजनिक बँकेत ११,०२२ कोटी रुपयांच्या फसवणुकीची २,१६६ प्रकरणे उघडकीस आली आहेत.
