Lokmat Money > बिझनेस न्यूज > २१ लाख आॅडी कार प्रदूषण विळख्यात!

२१ लाख आॅडी कार प्रदूषण विळख्यात!

प्रदूषणाचे नियम पायदळी तुडवत फोक्सवॅगन कंपनी कारची विक्री करत असल्याचे उघड झाल्यानंतर आता फोक्सवॅगनची सहयोगी कंपनी आॅडीही या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे.

By admin | Updated: September 28, 2015 23:25 IST2015-09-28T23:25:29+5:302015-09-28T23:25:29+5:30

प्रदूषणाचे नियम पायदळी तुडवत फोक्सवॅगन कंपनी कारची विक्री करत असल्याचे उघड झाल्यानंतर आता फोक्सवॅगनची सहयोगी कंपनी आॅडीही या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे.

21 million Audi car pollution! | २१ लाख आॅडी कार प्रदूषण विळख्यात!

२१ लाख आॅडी कार प्रदूषण विळख्यात!

फ्रँकफूर्ट/बर्लिन : प्रदूषणाचे नियम पायदळी तुडवत फोक्सवॅगन कंपनी कारची विक्री करत असल्याचे उघड झाल्यानंतर आता फोक्सवॅगनची सहयोगी कंपनी आॅडीही या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. आॅडीच्या २१ लाख कारमध्ये तेच सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहे, जे की फोक्सवॅगनच्या कारमध्ये आहे. आॅडीच्या एका प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आॅडीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार फक्त जर्मनीमध्येच पाच लाख ७७ हजार कारमध्ये हे सॉफ्टवेअर बसविलेले आहे. तर अमेरिकेतील १३००० कारमध्ये आणि युरोपमधील १४ लाख कारमध्ये हे सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरच्या मॉडेलमध्ये प्रामुख्याने ए १, ए ३, ए ४, क्यू ३, क्यू ५ आणि टीटी या मॉडेलचा समावेश आहे. प्रदूषणाच्या नियमांना डावलून हे सॉफ्टवेअर कारमध्ये बसविल्याचा कंपनीवर आरोप होत आहे. मागील आठवड्यातच फोक्सवॅगन कंपनीने हे मान्य केले होते की, त्यांच्या एक कोटी एक लाख डिझेल कारमध्ये हे सॉफ्टवेअर बसविलेले आहे.
कारमधील सॉफ्टवेअरच्या घोटाळ्याप्रकरणी फोक्सवॅगनचे माजी सीईओ मार्टिन विंटरकोर्न यांच्या भूमिकेचा तपास लावण्यासाठी जर्मनीत विंटरकोर्न यांची चौकशी सुरू झाली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 21 million Audi car pollution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.