नवी दिल्ली : भारतात अनेक भागात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या काळात २० हजार कोटी रुपयांच्या १०० लाख टन रबी पिकांचे नुकसान झाले आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने (सीएसई) हा अहवाल दिला
आहे.
काही भागात कमी पाऊस, कुठे अवकाळी तर कुठे अतिवृष्टी या कारणामुळे हे नुकसान झाले आहे. याचा परिणाम म्हणजे देशात चालू वर्षात १० लाख टन गहू आयात करावा लागू शकतो. कारण, रबीच्या मागच्या हंगामातही निसर्गाच्या लहरीपणामुळे ६८.२ लाख टन धान्याचे नुकसान झाले होते.
या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या काळात १८२.३८ लाख हेक्टरवर उभ्या पिकांचे २९.६१ टक्के नुकसान झाले आहे. यात सहा ते सात टक्के गव्हाचे पीक होते. अहवालात म्हटले आहे की, प्रमुख पिकांमध्ये उत्पादनातील घसरण ८६.३ लाख टन होती. यातील १५,७७७ कोटी रुपयांच्या धान्याचे नुकसान झाले आहे. तिळाच्या पिकात १४ लाख टन घसरणीसह ४,६७६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकूण नुकसान २०,४५३ कोटी रुपये इतके झाले आहे.
या अहवालानुसार गव्हाच्या पिकाचे नुकसान ४० टक्के, तिळाचे १४ टक्के तर इतर धान्याचे चार टक्के नुकसान झाले आहे. सीएसईचे उप महासंचालक चंंद्रभूषण यांनी सांगितले की, बाजारपेठेतील किमान मूल्य गृहीत धरून आम्ही पिकांच्या नुकसानीची ही आकडेवारी सादर केली आहे. या अहवालात या बाबींवरही जोर देण्यात आला आहे की, भारतातील शेतकरी निसर्गाच्या या लहरीपणामुळे मोठ्या कठीण प्रसंगातून जात आहे. यासाठी संरक्षण उपाय करण्याची गरज आहे. कारण, देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्या कृषी क्षेत्रात आणखी घसरण होऊ नये.
सीएसईच्या तज्ज्ञांनी बदलत्या हवामानामुळे झालेले नुकसान, त्यावर केले गेलेले उपाय, या उपायांचे परिणाम, उपाय आणि मोबदल्याची सध्याची व्यवस्था याचाही अभ्यास केला.
रबी पिकांचे वीस हजार कोटींचे नुकसान
भारतात अनेक भागात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या काळात २० हजार कोटी रुपयांच्या १०० लाख टन रबी पिकांचे नुकसान झाले आहे.
By admin | Updated: November 27, 2015 23:59 IST2015-11-27T23:59:38+5:302015-11-27T23:59:38+5:30
भारतात अनेक भागात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या काळात २० हजार कोटी रुपयांच्या १०० लाख टन रबी पिकांचे नुकसान झाले आहे.
