Lokmat Money > बिझनेस न्यूज > साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे २०० कोटी

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे २०० कोटी

मागील वर्षी गाळप केलेल्या उसाला एफ.आर.पी.(किमान आधारभूत मूल्य) नुसार शेतकऱ्यांचे २१२ कोटी थकविणाऱ्या जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांना पुणे

By admin | Updated: December 12, 2015 00:01 IST2015-12-12T00:01:57+5:302015-12-12T00:01:57+5:30

मागील वर्षी गाळप केलेल्या उसाला एफ.आर.पी.(किमान आधारभूत मूल्य) नुसार शेतकऱ्यांचे २१२ कोटी थकविणाऱ्या जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांना पुणे

200 crore of sugarcane farmers | साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे २०० कोटी

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे २०० कोटी

अरुण बारसकर, सोलापूर
मागील वर्षी गाळप केलेल्या उसाला एफ.आर.पी.(किमान आधारभूत मूल्य) नुसार शेतकऱ्यांचे २१२ कोटी थकविणाऱ्या जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांना पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर)नोटिसा बजावल्या आहेत.
पुणे विभागातील ६० पैकी ३० कारखान्यांनी एफ.आर.पी. प्रमाणे दर दिला नसल्याने त्यांना १४ व १६ डिसेंबर रोजी सुनावणीला हजर राहण्याचे नोटिसीमध्ये म्हटले
आहे.
२०१४-१५ या वर्षीच्या गाळपासाठी आणलेल्या उसाला एफ.आर.पी. प्रमाणे दर देणे बंधनकारक आहे. असे असताना राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफ.आर.पी.प्रमाणे उसाला दर दिला नाही. अशा साखर कारखान्यांना यावर्षीच्या हंगामासाठी गाळप परवानाच नाकारला होता; मात्र साखर कारखानदारांनी हंगाम सुरू करण्यासाठी २०० रुपयांच्या स्टॅम्पवर कारखाना सुरू केल्यानंतर एक महिन्यात मागील वर्षीचे देणे देण्याची हमी दिली होती. हे सर्व साखर कारखाने यावर्षी सुरुही झाले
आहेत.
मागील वर्षीचे देणे देण्याची मुदत संपल्याने विभागीय साखर सहसंचालकांनी या कारखान्यांनी नोटिसा काढल्या आहेत. काही कारखान्यांनी १४ व काहींना १६ डिसेंबर रोजी पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी बोलावले
आहे.

Web Title: 200 crore of sugarcane farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.