नवी दिल्ली : सरकारने २० हजार ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीय आॅप्टिकल फायबर नेटवर्कचे (एनओएफएन) काम पूर्ण केले आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत सरकारने हे नेटवर्क ५० हजार ग्रामपंचायतींना देण्याचे लक्ष्य ठरविले होते व २०१६ अखेर सगळ्या अडीच लाख ग्रामपंचायतींना या नेटवर्कने जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले
आहे.
दूरसंचारच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नव्या सरकारच्या कार्यकाळात त्या आधीच्या सरकारच्या तुलनेत कामे ३७५ टक्के जास्त झाली आहेत.
नवे सरकार आल्यापासून १,६०० किलोमीटर लांब फायबर अंथरण्यात आली आहे. आता २० हजार ग्रामपंचायतींमध्ये हे नेटवर्कचे काम पूर्ण झाले असून आणखी १० हजार ग्रामपंचायतींमध्ये काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या नेटवर्कची योजना २०११ मध्ये सुरू झाली होती. नियोजनानुसार हे काम २०१३ मध्ये पूर्ण व्हायला हवे होते.
नंतर संयुक्त पुरोगामी सरकारने त्याची मुदत २०१५ केली. भाजप सरकारने नवे लक्ष्य निश्चित केल्यामुळे ही मुदत वाढवून २०१६ करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
२० हजार ग्रामपंचायतींना मिळाले ब्रॉडबँड नेटवर्क
सरकारने २० हजार ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीय आॅप्टिकल फायबर नेटवर्कचे (एनओएफएन) काम पूर्ण केले आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत सरकारने हे नेटवर्क
By admin | Updated: April 3, 2015 00:10 IST2015-04-03T00:10:48+5:302015-04-03T00:10:48+5:30
सरकारने २० हजार ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीय आॅप्टिकल फायबर नेटवर्कचे (एनओएफएन) काम पूर्ण केले आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत सरकारने हे नेटवर्क
