नवी दिल्ली : जपानच्या सॉफ्ट बँक कोर्पने भारती इंटरप्रायजेज (भारत) आणि फाक्सकॉन (तैवान) यांच्या अल्प भागीदारीसह भारतात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सोमवारी २० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली.
जपानमध्ये मुख्यालय असलेली दूरसंचार व इंटरनेट कंपनी सॉफ्ट बँकने यापूर्वी भारतात आपण येत्या १० वर्षांत दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले होते. या तिन्ही कंपन्या मिळून भारतात २० गीगा वॅट्सचे अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारतील. तत्पूर्वी, कंपनीचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासायोशी सोन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नविनीकरण ऊर्जाक्षेत्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली होती. (वृत्तसंस्था)
२० अब्ज डॉलरची गुंतवणूक
जपानच्या सॉफ्ट बँक कोर्पने भारती इंटरप्रायजेज (भारत) आणि फाक्सकॉन (तैवान) यांच्या अल्प भागीदारीसह भारतात सौरऊर्जा प्रकल्प
By admin | Updated: June 22, 2015 23:34 IST2015-06-22T23:34:21+5:302015-06-22T23:34:21+5:30
जपानच्या सॉफ्ट बँक कोर्पने भारती इंटरप्रायजेज (भारत) आणि फाक्सकॉन (तैवान) यांच्या अल्प भागीदारीसह भारतात सौरऊर्जा प्रकल्प
