नवी दिल्ली : सोन्याच्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या तेजीला मंगळवारी अखेर ब्रेक लागला. राजधानी दिल्लीत तीन महिन्यांच्या उच्चांकावर असलेला सोन्याचा भाव २१५ रुपयांनी घसरून २७,३६0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. चांदी ८00 रुपयांनी घसरून ३५,५00 रुपये किलो झाली.
जागतिक बाजारात सोन्या-चांदीची घसरण सुरू आहे. त्याच मार्गाने भारतीय बाजारही गेल्याचे सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. भाव उतरू शकतात, अशी शक्यता गृहीत धरून दागिने निर्मात्यांनी खरेदीत हात आखडता घेतल्याने दिल्लीत भाव उतरले, असेही सांगण्यात आले.
गेल्या १४ दिवसांत सोन्याचा भाव तब्बल २,५९५ रुपयांनी वाढला होता. यंदाच्या वर्षात सराफा बाजारात सलग १४ दिवसांची तेजी प्रथमच पाहायला मिळाली होती. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २१५ रुपयांनी घसरून अनुक्रमे २७,३६0 रुपये आणि २७,२१0 रुपये तोळा झाला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मात्र २२,७00 रुपये असा आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिला. तयार चांदीचा भाव ८00 रुपयांनी घसरून ३५,५00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ६६५ रुपयांनी घसरून ३५,१९५ रुपये किलो झाला. बाजाराच्या एकूण कलानुसार, चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ५१,000 रुपये आणि विक्रीसाठी ५२,000 रुपये प्रति शेकडा झाला.
सोन्याच्या २ आठवड्यांच्या तेजीला ब्रेक
सोन्याच्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या तेजीला मंगळवारी अखेर ब्रेक लागला. राजधानी दिल्लीत तीन महिन्यांच्या उच्चांकावर असलेला सोन्याचा भाव २१५ रुपयांनी
By admin | Updated: August 26, 2015 03:22 IST2015-08-26T03:22:09+5:302015-08-26T03:22:09+5:30
सोन्याच्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या तेजीला मंगळवारी अखेर ब्रेक लागला. राजधानी दिल्लीत तीन महिन्यांच्या उच्चांकावर असलेला सोन्याचा भाव २१५ रुपयांनी
