ग्रीसमधील राजकीय अस्थिरतेमुळे जगभरात उमटलेले चिंतेचे पडसाद, भारतीय सत्ताधाऱ्यांकडून आगामी काळात होऊ घातलेल्या आर्थिक सुधारणा, डिसेंबर महिन्यात वाढलेला पीएमआय अशा पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार नवीन वर्षाच्या पहिल्या सप्ताहात वाढीव पातळीवर बंद झाला. निर्देशांकाने चार आठवड्यातील उच्चांक नोंदविला.
मुंबई शेअर बाजारात गत सप्ताह तेजीचा राहिला. सप्ताहात सर्वच दिवस निर्देशांक वाढीव पातळीवर बंद होताना दिसला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २७,९३७ ते २७,८८७ अंशांदरम्यान हेलकावत होता. अखेरीस मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकापेक्षा ६४६.१२ अंशांनी वाढून तो २७,८८७.९0 अंशांवर बंद झाला. त्यामध्ये २.३७ टक्के वाढ झाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही २.३७ टक्के म्हणजेच १९४.७५ अंशांची वाढ होऊन तो ८३९५.४५ अंशांवर बंद झाला. सप्ताहाच्या दरम्यान निफ्टीने ८,४00 अंशांची पातळी एकदा ओलांडली होती मात्र ही पातळी कायम राखण्यात निर्देशांक अपयशी ठरला.
वर्षाच्या पहिल्याच सप्ताहात २ टक्क्यांनी वाढ
ग्रीसमधील राजकीय अस्थिरतेमुळे जगभरात उमटलेले चिंतेचे पडसाद, भारतीय सत्ताधाऱ्यांकडून आगामी काळात होऊ घातलेल्या आर्थिक सुधारणा
By admin | Updated: January 4, 2015 22:15 IST2015-01-04T22:15:01+5:302015-01-04T22:15:01+5:30
ग्रीसमधील राजकीय अस्थिरतेमुळे जगभरात उमटलेले चिंतेचे पडसाद, भारतीय सत्ताधाऱ्यांकडून आगामी काळात होऊ घातलेल्या आर्थिक सुधारणा
