नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांकडे मोठ्या प्रमाणात रोकड पडून आहे. ही रक्कम जर भांडवली गुंतवणूक म्हणून वापरली तर या आस्थापनांचा नफा वाढण्याची शक्यता असून त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये या आस्थापनांच्या नफ्यात घट झाली असली तरी त्यांच्या हातातील रोकड मात्र पाच वर्षांपासून कायम असल्याचे दिसत आहे. याच जोडीला खसगी उद्योगांकडेही ४.६ लाख कोटी रुपयांची रोकड असल्याचे जाहीर झाले आहे.
मार्च २०१४ अखेरीस केंद्र सरकारचे उपक्रम असलेल्या ५४ प्रमुख नोंदणीकृत आस्थापनांकडे दोन लाख कोटी रुपयांची रोकड शिल्लक असल्याचे दिसून आले आहे. गेली पाच वर्षे या आस्थापनांकडे ही रक्कम कायम आहे. त्यावर मिळणारे व्याज हे अत्यल्प असते.ही रक्कम जर या आस्थापनांनी भांडवली खर्चामध्ये परिवर्तित केली तर त्यांना अधिक फायदा मिळू शकतो.गेल्या पाच वर्षांमध्ये या आस्थापनांनी भांडवली खर्चामध्ये सुमारे १३.७ टक्कयांनी वाढ केली आहे. मात्र त्यांनी हातामधील रोकड काही कमी केलेली नाही.
तज्ज्ञांच्या मते सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी ही रक्कम कमी केल्यास त्यांच्या नफ्यामध्ये वाढ होऊ शकेल. गेल्या पाच वर्षांमध्ये या आस्थापनांच्या वाढीचा दर १०.९ टक्के राहिला आहे. मात्र त्यांच्या नफ्यामध्ये कपात झालेली दिसून येत आहे.
सन २००९-०९ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्या नफ्यातील ३३.१ टक्के रक्कम ही लाभांश स्वरुपात वाटली होती. सन २०१३-१४ मध्ये हे प्रमाण ४५.५ टक्कयांपर्यंत वाढले आहे. मात्र त्यांच्या नफा कमविण्याच्या क्षमतेमध्ये घट झालेली दिसत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सार्वजनिक क्षेत्राकडे २ लाख कोटी पडून
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांकडे मोठ्या प्रमाणात रोकड पडून आहे. ही रक्कम जर भांडवली गुंतवणूक म्हणून वापरली तर या आस्थापनांचा नफा
By admin | Updated: December 26, 2014 23:39 IST2014-12-26T23:39:53+5:302014-12-26T23:39:53+5:30
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांकडे मोठ्या प्रमाणात रोकड पडून आहे. ही रक्कम जर भांडवली गुंतवणूक म्हणून वापरली तर या आस्थापनांचा नफा
